अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाची कार्यवाई


सडक/अर्जुनी, ( बबलू मारवाडे )  दिनांक : २६ ऑगस्ट २०२२ : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चुलबंद नदी पात्रातून अवैध रित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर महसूल विभागाच्या पथकाने कार्यवाई केली आहे. दरम्यान वाळू वाहतूक बाबद परवाना अश्ल्यास दाखवावा असी विचारणा पथकातील लोकांनी वाहन धारकाला केली. मात्र वाहन चालकाकडे कोणतेही परवाना उपलब्द नवते, त्या मुळे वाहन चालक अंतराम मारोती सय्याम रा. गिरोला, यांच्याकडून वाहन जप्त करून घटनास्थळी पंचनामा तय्यार करण्यात आला.





ही कार्यवाई दिनांक : २३ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्राम तेली घाटबोरी परिसरात सकाळी ८.५० वाजता करण्यात आली आहे. वाहन मालक राजू परसुरामकर असे आहे. ट्रकटर क्रमांक : एम.एच. ३५ जी. ८८५२ असे असून  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वय दंडात्मक कार्यवाई करण्यात आली आहे. सदर कार्यवाई तहसीलदार किशोर बागळे, डी.बी. वरखडे मंडळ अधिकारी, तलाठी बी.बी. नंदागवळी, महसूल वाहन चालक यांनी केली असून वाहन तहसील कार्यालयात जप्ती करून ठेवण्यात आला आहे. अध्याप दंडाची रक्कम सांगण्यात आली नाही.



 

Leave a Comment