अर्जुनी मोर, गोंदिया, संतोष रोकडे, दी. 15 जुलै 2022 : तालुक्यातील अर्जुनी मोर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सह वनक्षेत्र महागाव बीट माहूरकुडा येथे दिनांक 10 जुलै रोजी सकाळी रानडुक्कर या वन्य प्राण्यांची शिकार करून मास विक्री करत असल्याच्या गुप्त माहितीवरून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून आरोपी प्रल्हाद मडावी लालचंद डोंगरे मंगल मडावी गणपत मडावी दसरत कोल्हे राहणार सर्व माहूरकुडा यांना रंगेहात पकडून आरोपींना तालुका प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी अर्जुनी मोर यांच्या समोर हजर केले.
सर्व आरोपींना 13 जुलै पर्यंत वन कोठडी ठोठावण्यात आली ही कारवाई अर्जुनी मोर वन परिक्षेत्र अधिकारी एस डी खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक डब्ल्यू एस वेलतुरे यूपी गोटेफोडे वनरक्षक एल एस चोले, डी टी मुनेश्वर, सचिन गावंडे, शिवशंकर बसेल, नितीन पाटील, राजेश ढोक, आर डी राणे, एस परशूरामकर, विश्वास कोलाम यांनी केले पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी खोब्रागडे करीत आहेत.