शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बैंकेवर गुन्हे दाखल करा – आ.विनोद अग्रवाल


  • आ. विनोद अग्रवाल यांनी उपविभागीय कार्यालयातील बैठकीत शेतकऱ्यांना जुलै अखेर कर्जवाटप करण्याचे बैकांना दिले निर्देश

प्रतिनिधी/गोंदिया, दी. 15 जुलै 2022 : पावसाळाच्या दिवसांची सुरुवात झाली असून शेतक-यांनी रोपांची लागवड सुरु केली आहे. एकीकड़े मुसळधार पावसामुळे शेतक-यांचे नुकसान सुद्धा होत आहे. अश्या बरेच शेतक-यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आ.विनोद अग्रवाल यांनी उपविभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीमध्ये बैंकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैंकेला मिळालेला लक्षांक पैकी इतके कर्ज झाले वाटप… 

त्यात को-ओपरेटिव बैंकेला ३८.९५ लक्ष इतके लक्षांक दिले असून त्यापैकी त्यांनी १७.३६ लक्ष इतकेच कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण बैंक ७००.४२ लक्ष इतके कर्ज देण्याचे लक्षाक आहे त्यापैकी ५०० लक्ष इतके कर्ज त्यांनी वाटप केले आहे व उर्वरित लगेच जुलाई मध्ये लक्षांक पूर्ण करणार आहेत असे प्रतिनिधी यांनी हमी दिली आहे.तसेच या पैकी लक्षांक पूर्ण झाल्यानंतर आणखी अन्य शेतक-यांना पीक कर्ज देता येते असे ही प्रतिनिधी बोलले. पंजाब नेशनल बैंक यांना २.कोटी ८५ लक्ष इतके लक्षांक दिले असून त्यापैकी २० टक्केच कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. बैंक ऑफ़ बरौदाला ५ कोटी इतके लक्षांक दिले आहेत त्यापैकी फ़क्त ८५ लक्ष इतकेच कर्ज देण्यात आले आहे.इतर लक्षांक समोरच्या आठवड्यात करण्याची हमी दिली आहे. आयडीबीआई बैंकेला १.७३ लक्ष इतके लक्षांक दिले आहेत परंतु त्यापैकी ५२ लक्ष इतकेचे त्यांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तसेच इन्डियन ओवरसीज़ बैंक यांनी ६० लक्ष पैकी ११ लक्ष इतके लक्षांक पूर्ण केले आहे. व या दरम्यान स्टेट बैंक ऑफ इण्डिया, एच.डी.एफ.सी बैंक, केनेरा बैंक यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित नव्हते.

शासनाच्या धोरणाच्या पालन करा अन्यथा पीक कर्ज वाटप न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल – आ.विनोद अग्रवाल

आ.विनोद अग्रवाल यांनी सदर बैठकीमध्ये म्हणाले की एकीकड़े केंद्र शासन तसेच राज्य शासनाचे सुद्धा धोरण आहे की शेतक-यांना पीक कर्ज देण्यात यांवे व जितके लक्षांक देण्यात आले आहे व कोणत्याही शेतक-यांना त्रास न देता टाळाटाळ न करता पीक कर्जाचे वाटप करण्यात यांवे व दिलेले लक्षांक पूर्ण केले पाहिजे असे ते बोलले. परंतु अनेक बैंकेनी जुलै महिना संपण्याचा मार्गावर असून पूर्ण लक्षांक करण्यात आले नाही या साठी फटकारले व सदर बैठकीमध्ये बैंकेचे वरिष्ठ अधिकारी यांना जे बैंक शेतक-यांना कर्ज नाही देत आहेत अश्या बैंकेवर गुन्हे दाखल करा किंवा कार्यवाही करा असे ही सूचना आ.विनोद अग्रवाल यांनी दिली आहे. प्रत्येक वेळी राष्ट्रीयकृत बैंकेचा लक्षांक पूर्ण होत नाही त्यांनी यावर लक्ष देने अत्यंत महत्वाचे असून गरजेचे आहे. व ज्या शेतक-यांना पीक कर्ज नाही मिळत आहे अश्या शेतक-यांना एआर सोनकर यांच्याकड़े जाऊन भेट द्यावे असे कळविले आहे तसेच ज्यांनी शेतक-याना पीक कर्ज नाही दिले त्यांच्यावर कार्यवाही करा व शेतक-यांना कर्ज न मिळाल्याची सुचना मिळाली नाही पाहिजे नाही तर तीव्र शेतक-यांच्या हितार्थ आंदोलन करण्याचा ईशारा ही आ.विनोद अग्रवाल यांनी दिला आहे.तसेच काही अडचणी निर्माण होत असतील तर नाबार्ड चा सहयोग घ्या अशी सुचना आ.विनोद अग्रवाल यांनी दिली आहे.

पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठकी घेऊन तयार केले होते पीक कर्जाचे नियोजन

आ.विनोद अग्रवाल हे बोलले की गोंदिया तालुक्यातील शेतक-यांना कर्जाचे वाटप करण्यात यांवे या साठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, यांच्यासह बैठकी घेउन नियोजन करण्यात आले होते. तसेच भारत हा कृषी प्रधान राष्ट्र असून गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग व्याप्त असून त्यांचे मुख्य व्यवसाय शेती आहे. तसेच बैठकीमध्ये बैंकेचे एआर सोनकर यांना सुचना दिली की शेतक-यांच्या समस्या बाबत सेवा सहकारी अध्यक्ष, गट सचिव, यांच्याशी संपर्क साधुन १० दिवसात बैठक लावा व शेतक-यांच्या समस्यांचा निराकरण करा असे निर्देश दिले.

शोधून देवही सापडेल पण पटवारी कार्यालयात हजर राहत नाही – आ. विनोद अग्रवाल

ग्रामीण भागातील तलाठी कार्यालयात तलाठी उपस्थित राहत नाही त्यामुळे शेतक-यांना बरेच अडचणी निर्माण होत असतात. शेतक-यांना ७/१२ संजय गांधी, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी तसेच कामामध्ये निष्काळजीपणा असते त्यामुळे बोगस माहिती सुद्धा देण्यात येत आहे. त्यांची योग्य चौकशी करा असे ही निर्देश आ.विनोद अग्रवाल यांनी बैठकीमध्ये तहसीलदार यांना दिले.

सदर बैठकीमध्ये प्रामुख्याने आ.विनोद अग्रवाल, उपविभागीय अधिकारी, पाटील, तहसीलदार ग्रामीण खांडरे, अप्पर तहसीलदार खडतकर, तालुका कृषी अधिकारी तुमडाम, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, खंड विकास अधिकारी पुराम, एआर सोनकर, मोहन गौतम, जिलाध्यक्ष किसान आघाडी जनता की पार्टी, चाबी संगठन, पृथ्वीराजसिंह नागपुरे, सुधीर चंद्रिकापुरे, कमलेश सोनवाने, राहुल मेश्राम पंचायत समिती, सदस्य कुडवा, विक्की बघेले, धर्मेन्द्र डोहरे, छगन माने, रंजित बारलिंगे, अतुल शरणागत, मनीष वैष्णव, ओमकार नागफासे, इत्यादी या दरम्यान बैठकीमध्ये उपस्थित होते.


 

Leave a Comment