कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करा : आ. मनोहर चंद्रिकापुरे


सडक अर्जुनी, गोंदिया, दि. 16 जुलै 2022 : शेतकरी हा देशाचा केंद्र बिंदू मानून त्याची आर्थिक स्थिती मजबूत केली पाहिजे. तालुक्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट त्वरीत पूर्ण करावे असे निर्देश आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी संबंधीत बँकाचे व्यवस्थापकांना दिले.

कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी/मोरगांव येथे १५ जुलैला शेतकरी कर्जवाटप उद्दिष्ट पूर्ण करण्याकरीता सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेचे अध्यक्ष आमदार चंद्रिकापुरे, प्रमुख मार्गदर्शन अर्जुनी मोरगाव चे प्रभारी तालुका सहाय्यक निबंधक हर्षल काळीकर, कृ.उ.बा.स. चे मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे.

प्रशासक उद्धव मेहंदळे, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भोजराज रहिले, स्टेट बँक ऑफ इंडिया, वेनगंगा क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा महागाव, शाखा बोंडगाव शाखा, अर्जुनी मोरगाव, बँक ऑफ बडोदा शाखा अर्जुनी मोर ,नवेगाव बांध, गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा अर्जुनी मोरगाव, बोंडगावंदेवी शाखा महागाव शाखा , केशोरी शाखा, नवेगाव बांध शाखाचे व्यवस्थापक पंचायत समिती अर्जुनी मोर कृषी विभागाचे प्रतिनिधी यावेळी प्रामुख्याने हजार होते.

आमदार चंद्रिकापुरे यांनी प्रत्येक बँकच्या कर्ज वाटपा बद्दल आढावा घेतला राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे संबंधित शाखा व्यवस्थापकांना सांगितले आपण स्वतः व्यक्तीश कर्ज वाटपा संबंधी प्रत्यक्षात गावात जाऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात सहकार्य करण्याचे सांगितले.

शेतकऱ्यांचे जिल्ह्याची बँक असलेले जिल्ह्याचे मध्यवर्ती बँक च्या तालुकातील महागाव, अर्जुनी, केशरी, नवेगाव, बोंडगाव देवी येथील शाखा व्यवस्थापक आणि विशेष लक्ष देऊन लवकरात लवकर कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे सध्या सर्वाकडे रोवणे सुरू असून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज द्यावे असे सुद्धा सांगितले.

यावेळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य ,आदिवासी सेवा सहकारी संस्थेचे प्रतिनिधी गटसचिव प्रामुख्याने उपस्थित होते आमदार, सहाय्यक निबंधक व सर्व बँकचे व्यवस्थापक यावेळी हजर असल्याने शेतकरी व संस्थाचे प्रतिनिधी विविध अडचणी समस्या विशद केल्या आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी सर्व समस्यांचे तत्काळ निवारण करून पीक कर्ज वाटपांचे उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश दिले.

सर्वांचे आभार तालुका सहाय्यक निबंधक हर्षल काडीकर यांनी मानले सभेच्या यशस्वी करिता सहाय्यक निबंधक कार्यालयाचे बुरले, गौतम तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय सिंगनजुडे यांनी सहकार्य केले.


 

Leave a Comment