आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची डव्वा शिवभोजन केंद्राला भेट


सडक अर्जुनी, गोंदिया, दी. 15 जुलै 2022 : दिनांक १३ जुलै ला डव्वा येथील प्रगतिशील बहु.उद्देशिय अभिनव सेवा सह.संस्था संचालित शिव भोजन केंद्राला मोरगाव अर्जुनी निर्वाचन क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी भेट देऊन देण्यात येणाऱ्या भोजन व्यवस्थेची पाहणी केली.

सडक अर्जुनी तालुक्यात एकूण पाच शिवभोजन केंद्र सुरू असून त्यापैकी हे एक मेव शिवभोजन केंद्र तालुक्याचे बाहेर ग्रामीण भागात डव्वा येथे सुरू आहे. आमदार महोदयांनी भोजन कर्मचारी व संस्थेचे अध्यक्ष यांचेशी संवाद साधून भोजन क्वालिटी बाबत विचारणा केली व त्यांना अशाच प्रकारे स्वच्छता नेहमी ठेवण्यास सांगितले.

यावेळी आमदार साहेबांनी भोजनाचा स्वाद घेऊन भोजनाचा दर्जा छान असल्याचे मनोगत भेट पुस्तिकेत स्वहस्ताक्षरात लिहून अभिप्राय नोंदविले व भोजन व्यवस्था बाबत समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात अती गरजू साठी शिवभोजन योजना गरजू लोकांच्या हिताची असल्याने ही योजना पुढेही महाराष्ट्र शासनाने सुरू ठेवावी असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी सोबत सरपंच पुष्पमाला बडोले, संस्था अध्यक्ष एफ.आर टी. शहा, कर्मचारी अनिल बागडे, मेजर कटांगे, प्रशांत डोंगरे, विशाखा जांभूळकर, शारदा राऊत, पोर्णिमा बडोले, भोजन लाभार्थी हजर होते.


 

Leave a Comment