आरंभ फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण.


  • रत्नदीपच्या विद्यार्थ्यांना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक’ पुरस्कार प्रदान.

सड‌क अर्जुनी, गोंदिया, दिं. 03 जुलै 2022 : पळसगाव/राका येथील आरंभ फाउंडेशन इंडीया (समाज कार्य उपक्रम) चे वतीने १ जुलै २०२२ ला रत्नदीप विद्यालय चिखली येथील इयत्ता दहावीतील तीन गुणवंत विद्यार्थीनींना ‘प्रमानंद रंगारी प्रेरक’ पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एल. एम. पातोडे होते.
पुरस्कार वितरक म्हणून अमेरिका येथील आरंभ फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष प्रमानंद रंगारी व आरंभ रंगारी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आरंभ फाउंडेशनचे संचालक जी. के डेकाटे, शालीक डांगे, भोजराज रामटेके, शिक्षक व्ही. एल. जनबंधू, आदित्य रामटेके, आरंभ फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम, संचालक एच.पी.डोंगरे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मल्यारपण करून अभिवादन केले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मार्च २०२२ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्रथम कु.अंजली अशोक बडोले, व्दितीय अंजली सत्वशिल शेंडे व तृतीय कु.स्नेहा राजेंद्र राजगडे इत्यादी तीन विद्यार्थीनींना आरंभ फाउंडेशन इंडियाच्या वतीने सन्मानचिन्ह, रोख रक्कम, बॅग, पुस्तके व पुष्पगुच्छ देवून संस्थापक प्रमानंद रंगारी, आरंभ रंगारी व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

तसेच फाउंडेशनचे संचालक जी.के. डेकाटे व शालीक डांगे यांचा देखील शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. ‘शिक्षणामुळे आयुष्य बदलते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मेहनत करून उच्च शिक्षण घ्यावे, समाजसुधारकांच्या विचारांचे वाचन करावे’ असे प्रमानंद रंगारी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. प्रकल्प समन्वयक आर. व्ही. मेश्राम यांनी प्रास्ताविकातून आरंभ फाउंडेशन इंडियाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक एस. बी. मेंढे यांनी केले तर आभार संचालक एच.पी. डोंगरे यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक ए.बी. बोरकर, पी.एच. पटले, एच.ए., लांडगे,कु.जे. एस. कढव, डी.डी.कापगते ,वाय. जी. कोरे, एम.डब्ल्यू. शिवनकर व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

उल्लेखनीय म्हणजे, प्रमानंद रंगारी यांनी चिखली येथील रत्नदीप विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेतले. सध्या ते अमेरिकेत नोकरीवर आहेत. मागील पाच वर्षापासून आरंभ फाउंडेशन इंडीयाच्या वतीने विविध उपक्रम राबवित आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रत्नदीप विद्यालयातील शिक्षक व कर्चाऱ्यांनी
सहकार्य केले. सडक अर्जुनी. चिखली येथील पुरस्कार प्राप्त विध्यार्थीनी, उपस्थित अमेरिकेचे प्रमानंद रंगारी व इतर मान्यवर.


 

Leave a Comment