माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाची विस्तृत आढावा बैठक


गोंदिया, दींनाक: 03 जुलै 2022 : आगामी गोंदिया नगरपरिषद निवडणुक संदर्भात माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाची विस्तृत आढावा बैठक 02 जुलै रोजी संपन्न झाली. भाजप कार्यालय गोंदिया येथे आगामी “गोंदिया नगरपरिषद” निवडणुकी संदर्भात माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी गोंदिया शहराची “विस्तृत आढावा बैठक” संपन्न झाली.

सदर बैठकीत पक्ष संघटन, बुथ रचना व भारतीय जनता पक्ष प्रदेशाने दिलेले कार्यक्रम व आगामी कार्यक्रम व विविध आघाडी यांनी केलेले कार्यक्रम तसेच विविध विषयांवर उपस्थित भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली व मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा संघटन महामंत्री संजय कुळकर्णी, माजी आमदार रमेश कुथे, शहराध्यक्ष सुनिल केलनका, शंभु ठाकरे, जिल्हा सहकार अध्यक्ष दिपक कदम, जिल्हा महिला अध्यक्ष भावनाताई कदम, महामंत्री शालिनीताई डोंगरे, महीला तालुकाध्यक्ष ॲड. हेमलताताई फतेह, अनु जाती मोर्चा अध्यक्ष बागडे, युवा मोर्चा अध्यक्ष पलाश लालवानी, अमित झा.. व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Comment