सडक अर्जुनी, गोंदिया, दि. 10 जून 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज व फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून पक्ष स्थापनेपासून कार्य करत आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याची व पुरोगामी, विकासात्मक वाटचालीची भूमिका पक्षाने नेहमीच जपली आहे. विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा पक्षाने प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका सडक/अर्जुनी चा वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वर्धापन दिन आमदार मा. मनोहर चंद्रिकापुरे यांचा जनसंपर्क कार्यालय एरिया 51 येथे नगरपंचायत सडक/अर्जुनी चे अध्यक्ष मा. तेजरामजी मडावी यांचा अध्यक्षीयखाली डॉ. अविनाश काशीवार अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचा हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आले.
पक्षाचा २३ वा वर्धापन दिन साजरा करताना मागील वर्षभरात पक्षाने राबविलेले विविध उपक्रम, घेतलेले महत्त्वाचे निर्णय यांचा आढावा घेण्यात आले. याप्रसंगी जि.प.सदस्य सुधाताई रहांगडाले, नगरपंचायत सडक/अर्जुनी उपाध्यक्ष वंदनाताई डोंगरवार, तालुका अध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रजनीताई गिरेपूंजे, सभापती नगरपंचायत स/अर्जुनी कामिनीताई कोवे, पंचायत समिती सदस्य डॉ. रुखिराम वाढई.
पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, माजी जि.प सदस्य रमेश चू-हे , माजी जि.प नरेश भेंडारकर, देवचंद तरोणे नगरसेवक, शशिकलाताई टेंभुर्णी नगरसेवक, आनंद अग्रवाल नगरसेवक, दीक्षाताई भगत नगरसेवक, शाइस्ता शेख नगरसेवक, मंजूताई डोंगरवार माजी प.स सदस्य, डी.यु रहांगडले तालुका अध्यक्ष सरपंच सेवा संघटना, दिनेश कोरे सरपंच घोटी ,उमराव मांढरे, शुभांगीताई वाढवे, छायाताई टेकाम सरपंच रेंगेपार, राहुल यावलकर तालुका अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
दिलीप गभने, ओमेश कापगते, अशोक लांजेवार, देवाजी बनकर, सुभाष कापगते, विलास उईके, मतीन शेख ,शंकर डोंगरवार, प्रमोद लांजेवार, भूमेश्वर लंजे, अनिताताई बांम्बोर्डे उपसरपंच चीचटोला, वानिताताई गहाणे, प्रमिलाताई बडवाईक, ओम प्रकाश टेंभुर्णी, हेमराज खोटेले, फारुक शेख, चंदूभाऊ बहेकार, नाजूक झिंगरे, उद्धवभाऊ परशुरामकर, आशिष येरणे, भानुमती बोपचे, सजीव शहारे तसेच तालुका सडक अर्जुनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महेंद्र चंद्रिकापुरे यांनी केले तर आभार प्रशांत डोंगरे यांनी मानले.