सडक अर्जुनी, गोंदिया, दीं. 10 जून 2022 : कृषि विभागाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात शेतीशाळेचे आयोजन करण्यात येते. शेती शाळेमध्ये 25 शेतकऱ्यांची निवड करून शेतीशाळा राबवली जाते. त्या शेती शाळेमध्ये माती परीक्षण, बीज प्रक्रिया, बियाणे पेरणी, पिकांमधील आंतर मशागत, रोग व किडी ची ओळख , मित्र कीड व शत्रू कीड यांची ओळख पीक संरक्षण व तसेच पिकाची कापणी व साठवणूक या सर्व बाबींवर तांत्रिक मार्गदर्शन केले जाते.
शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी कृषी सहाय्यक राजशेखर राणे यांनी विशेष महिलांची शेती शाळा राबवण्याचे ठरवले. त्यामध्ये 30 महिलांची निवड करून दोन गटांमध्ये पंधरा-पंधरा महिलांची विभागणी करून महिलांचे दोन गट शेती शाळेसाठी निवडण्यात आले. त्यामध्ये महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दाखवला व शेती शाळेचा पहिला वर्ग यशस्वी राबवला. या शेती शाळेमध्ये धान पिकाच्या वाणांची निवड बीज प्रक्रिया माती नमुने तसेच गादीवाफ्यावर धान पिकावर ची पेरणी यांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक राजशेखर राणे यांनी महिला शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शाळेचा हुबेहूब गणवेश सर्व महिलांना तयार करून घेतला सर्व महिलांना विद्यार्थी असल्याचा अनुभव प्राप्त होण्यासाठी गणवेश वाटप करून शेती शाळेची सुरुवात केली. तसेच युवा उन्नती शेतकरी गटाच्या सर्व पुरुष सदस्यांनी गुलाबी रंगाचे गणवेश परिधान करून शेतीशाळेची शोभा वाढवली. शेतीशाळेत महिलांचे मनोरंजन करण्यासाठी सांघिक खेळ पासिंग बॉल हा खेळ खेळून विजयी गटाला बक्षिसाची घोषणा करण्यात आली. शेतीशाळा प्रसंगी गावचे सरपंच उपसरपंच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी नावीन्यपूर्ण शेती शाळा पाण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी जमली होती.
कृषी सहाय्यक राजशेखर राणे यांच्या कार्याचे कृषी विभागातील अधिकारी तसेच गावकरी मंडळी त्यांनी कौतुक केले. सदर कार्यक्रमास बाम्हणी चे सरपंच श्यामराव चुटे, कृषिमित्र मोरेश्वर मेश्राम शंकर चूटे ,रोजगार सेवक विश्वनाथ तरोने, मोहन तवाडे , नंदकिशोर राऊत सामाजिक कार्यकर्ते गणेश वट्टी, संतोष लांजेवार ,नरेश जमदाळ ,डोमाजी पटणे, रमेश ईळपाते, किशोर तरोने, गोपाल जमदाळ, योगेश्वर डोये, व बाम्हणी क्षेत्रातील बहुसंख्य शेतकर्यांनी रंगीत संगीत शेतीशाळेचा गणवेशासह लाभ घेतला