सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक : 11 जून 2022 : तालुक्यातील सौंदड जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या खोडशिवणी येथे महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत आज ता.10 ला लाभार्थी यांच्या घरी जाऊन घरकुल बांधकामाचे भूमिपूजन जि प सदस्य निशाताई तोडासे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प स सभापती संगीताताई खोब्रागडे, उपसभापती शालीदर कापगते, गटविकास अधिकारी डॉक्टर श्रीकांत वाघाये, जि प सदस्य डॉक्टर भूमेश्वर पटले, कविता रंगारी, प स सदस्य डॉ. रुखीराम वाढई, चेतन वडगाये, वर्षा शहारे, सपना नाईक, विस्तार अधिकारी खुने, माजी जिप उपाध्यक्ष छाया ताई चव्हाण, सरपंच उर्मिला कंगाले, यात आर टी शहा, सरपंच पुष्पमाला ताई बडोले, खोडशिवणी येथील उपसरपंच लंजे, पत्रकार बिरला गणवीर, पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता वाय पी फुले, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता वैभव हाडगे, आशिष कापगते, भिक्की बिंझडे, सुशील चौधरी, प्रमोद बावणे ग्रापं सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी घरकुल लाभार्थी शेवंता दुधराम परशुरामकर, विनाराम राघो सोनवणे या लाभार्थ्याच्या प्रत्यक्ष घरी पोहोचून घरकुल बांधकामाचे भूमिपूजन उपस्थित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.