राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने दुसऱ्या सहकाऱ्यावर गोळी झाडून स्वतः ही केली आत्म हत्या


गडचिरोली, वृत्तसेवा, दींनाक : 01 जून 2022 : आज घडलेल्या घटने मुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे, या घटने मागचं नेमक कारण समोर आलेले नाही, एका जवानाने दुष्र्याला गोळी झाडत स्वतः आत्महत्या केली आहे.



गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या मरपल्ली पोलीस ठाण्यामध्ये नक्षलविरोधी अभियानासाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने दुसऱ्या सहकाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना आज दि. 01 जून 2022 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली.


हे ही पहा : सायन्स का जादू हातो से निकाला धुवा ( स्मोक ) l The Magic of Science Hand Smoke l


श्रीकांत बेरड आणि बंडू नवथरे अशी त्यांची नावे असून, ते दोघेही अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी तथा पुणे एसआरपीएफ ग्रुप : 01 चे जवान होते. काहीतरी कारणावरून सकाळी या दोघांमध्ये वाद झाला होता असे दरम्यान सांगितले जाते, त्यानंतर बंडू नवथरे कर्तव्यावर असताना श्रीकांत बेरड याने चार वाजेच्या सुमारास आपल्या रायफल ने त्याच्यावर गोळी झाडली. त्यानंतर काही अंतरावर जाऊन स्वत:वरही गोळी झाडून त्याने आत्महत्या केली.


हे ही पहा : पाणी से सिगारेट जलादिया? Did you light a cigarette with water? l


जिमलगट्टा वरून 20 किलोमीटर अंतरावर दुर्गम भागात असलेल्या मरपल्ली पोलीस ठाण्यामधील या थराराने पोलीस यंत्रणा हादरून गेला आहे, तर या बाबद अनेक चर्चांना उधाण आणणारे वृत्त समोर येत आहेत.


 

Leave a Comment