एफडीसीएम जांभळी च्या परिसरात 16 विदेशी पक्ष्यांचा मृत्यू कारण अस्पस्ट


गोंदिया, दींनाक : 02 जून 2022 : एफडीसीएम जांभळी च्या परिसरात 16 विदेशी पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त 01 जून रोजी समोर आले, मात्र मृत्यूचे कारण अद्याप अस्पस्ट आहे. जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम जांभळी वनक्षेत्रात सेवा संस्थेचे पदाधिकारी सर्वेक्षण करीत असतांना जंगलात 16 विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळले असून मृत पक्षांमध्ये शिक्रा, पुरेशियन स्पॅरो, किंगफिशर, कॉमन मैना, आदी पक्ष्यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते.


व्हिडिओ देखणे के लिये फोटो पर क्लिक करो .



या पक्षांचा मृत्यु हा विष प्रयोग अथवा उष्माघाताने झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. याची माहिती वने व वन्यजीव विभागाला देण्यात आली आहे. हे सर्व पक्षी अर्धवट कोरड्या नैसर्गिक पाणवठ्याजवळ आढळले आहेत. पक्ष्यांचे शरिरांचे अवयव कुजल्यामुळे या पक्ष्यांचे शवविच्छेदन करण्याकरिता नमुने पाठविले आहेत अशी माहिती मिळत आहे.


व्हिडिओ देखणे के लिये फोटो पर क्लिक करो .



या पक्ष्यांचा मृत्यू कसा झाला याचा शोध आता वनविभाग करित आहे, या संबंधित अधिक माहिती घेण्यासाठी सडक अर्जुनी येथील वन छेत्र अधिकारी सुनिल मडावी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदर परिसर हा जांभळी येथील वन विभाग अंतर्गत येणारे दुसरे विभाग एफ डी सी एम या विभागाचे वनछेत्र अधिकारी यांच्याकडे येते त्या नंतर त्यांना भ्रमण ध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.



पक्ष्यांच्या मृत्यू मुळे परिसरातील पसु पक्षी प्रेमी मध्ये नाराजी वेक्त होत आहे. वन विभाग दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद जंगलात जनावरांसह पक्ष्यांसाठी पानवठे बांधण्यासाठी करते मात्र ते कागदावरच नाही ना अशी शंका वेक्त केली जात आहे.


 

Leave a Comment