लोहिया शाळेत सहा.शिक्षक झोडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ


सडक/अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 01 जून 2022 : तालुक्यातील ग्राम सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , सौंदड येथे विद्यालयातील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त सहा. शिक्षक जे. एम. झोडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कार्यक्रम लोहिया शिक्षण संस्थेचे संस्थापक संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आला.



यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ. न. घाटबांधे-संस्था उपाध्यक्ष, संस्था सदस्य पंकज लोहिया, रामभाऊ झोडे, शमिम सय्यद शा.सू. समिती सदस्य , भजनदास बडोले, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, मुख्याध्यापक  मनोज शिंदे , उ.मा.स.शि. आर. एन. अग्रवाल सेवानिवृत्त शिक्षक जे. एम. झोडे उपस्थित होते.

जे. एम. झोडे यांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक -संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांनी “स्वार्थासाठी आणि कामपूर्तीसाठी जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात परंतु विचाराने आणि प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत असतात.” असे मार्गदर्शन केले.

प्राचार्य मधुसूदन अग्रवाल तसेच विद्यालयातील शिक्षकांनी जे. एम. झोडे यांच्या दीर्घ सेवेविषयी मनोगत व्यक्त केले व त्यांना भावी आरोग्यदायी, सुख-समृद्धीमय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन यु. बी. डोये यांनी केले तर आभार डी. ए. दरवडे यांनी मानले.


 

Leave a Comment