इंधन दरवाढ विरोधात युवासेनेचा थाली बजाओ खुशिया मनाओ आंदोलन

सडक/अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 03 : केंद्र सरकारने इंधन दरवाढ करून सामान्य जनतेला त्रस्त केले आहे. सतत वाढणारी महागाई ही सामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहे. म्हणून ही अभूतपूर्व इंधन दरवाढ साजरी करण्याकरिता एक अनोखा आनंद सोहळा म्हणून तालुका युवासेनेतर्फे आज दि.3 एप्रिल रोज रविवारला सडक अर्जुनी येथील मुख्य चौकात थाली बजाओ खुशियां मनाओ आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत टाळी व थाली वाजवण्यात आली. या आंदोलनाचे संयोजक म्हणून युवासेना तालुका अधिकारी सचीन फुंडे, शहर अधिकारी विशाल खेडकर, उपतालुका अधिकारी रेहान पटेल,  उपतालुका अधिकारी खुशाल देशमुख हे होते.

यावेळी या आंदोलनात प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुका प्रमुख मनोज रामटेके, युवासेना उपजिल्हाधिकारी महेश डुंभरे, शहर प्रमुख जुबेर शेख, बांधकाम सभापती महेंद्र वंजारी, सुबूर सौदागर, तालुका सचिव बबन बडोले, तालुका प्रसिद्धी प्रमुख अश्लेष माडे, हर्षित मडावी, रितेश खरोले, प्रशांत मेश्राम, मोनू उईके, सादिक शेख, मोनू शेख, प्रणय मडावी, हिमांशू पाटील,अतुल टेकाम, संदीप शेळके, राजा नवाज, बाबू पठाण, हर्षल, अप्रोच पठाण, विक्रम पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Comment