शेतकरी महिलांची बारामती कृषि विज्ञान केंद्राला भेट, फलोत्पादना विषयी घेतले प्रशिक्षण.


सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 03 एप्रिल 2022 : एकात्मिक फलोत्पादन विकास 2021- 22 मनुष्यबळ विकास कार्यक्रम अंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील 40 महिलांनी बारामती कृषि विज्ञान केंद्र जिल्हा पुणे येथे भेट देऊन फलोत्पादन विषयी माहिती जाणून घेण्यासाठी प्रशिक्षण घेतले. त्यानुरूप वर्धा येथील भाजीपाला प्रक्रिया प्रकल्पाला भेट, कळवंची येथील शेडनेट, हरितगृह व सामुहिक शेती आधारित शेती पाहणी केली, कृषि विज्ञान केंद्र खरपुंडी येथील भाजीपाला, शेळीपालन, कुकुटपालन, विषयी माहिती जाणून घेतली, महात्मा फुले कृषिविद्यापीठ राहुरी येथे प्रक्षेत्र भेट देऊन फलोत्पादन विषयी प्रशिक्षण घेतले, तालुका कृषि अधिकारी कु. प्रतीक्षा मेंढे यांच्या मार्गदर्शनात प्रक्षेत्र भेट व प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोंगरगाव येथील कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांचे सहकार्य लाभले, या प्रशिक्षणाला तालुक्यातील 40 महिला शेतकरी उपस्थीत होत्या.


 

Leave a Comment