टरबूज कापून शेतकऱ्यांनी अनोखा वाढदिवस केला साजरा.


  • बाम्हणी /ख अंतर्गत येणाऱ्या कृषि सहायक कार्यालय मार्फत टरबूज उत्पादक शेतकर्याचा वाढदिवस.

सडक अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 03 एप्रिल 2022 : तालुक्यातील ग्राम बाम्हणी /ख अंतर्गत येणाऱ्या कृषि सहायक कार्यालय मार्फत टरबूज उत्पादक शेतकर्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दिनांक 03 एप्रिल या दिवशी टरबूज उत्पादक दोन शेतकर्याच्या वाढदिवसाचे चे औचित्य साधून बाम्हणी येथील कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांनी युवा शेतकरी विश्वनाथ तरोने व नरेश जमदाळ यांचा वाढदिवस केक एवजी टरबूज कापून साजरा करण्याचे ठरवले.

कृषि सहाय्यक कार्यालय येथे सदर कार्यक्रम साजरा करण्याचे ठरवून गावातील शेतकरी गटाच्या सदस्याना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना आमंत्रण देण्यात आले. ठरल्या प्रमाणे सायंकाळी ठीक पाच वाजता टरबूज कापणी यंत्राच्या सहायाने टरबूज कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.

केक एवजी फळे कापून वाढदिवस साजरा केल्यास रासायनिक द्रव्ये, क्रीम पासून बनवलेल्या केक पासून आरोग्य धोक्यात येणार नाही तसेच वाढदिवसावर होणारा अवाजवी खर्च कमी करण्यास मदत होईल, त्यामुळे केक एवजी फळे कापून वाढदिवस साजरा करावा असे आव्हान कृषि सहाय्यक राजशेखर राणे यांनी उपस्थित शेतकर्यांना केले.

या प्रसंगी गोपाल जमदाळ, किशोर तरोने, , शंकर खोटेले, योगेश कोरे , लोकेश तरोने, प्रवीण तवाडे, टिकाराम चुटे, हेमराज लंजे, चंद्रशेखर सुरसाऊत , सर्व युवा शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. कृषि सहाय्यक राजशेखर राणे, तलाठी राजू उपरीकर, सरपंच मोहन सूरसाऊत, शुभम मेश्राम कृषि सहाय्यक कार्यालय व्यवस्थापक , रमेश ईळपाते , उपसरपंच शामराव चुटे , अजय मेश्राम यांनी हजेरी लावली.


 

Leave a Comment