दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईनच होणार


मुंबई, वृत्तसेवा, दी. 03 :- दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार असल्याचं महाराष्ट्र माध्यमिक मंडळानं जाहीर केलं आहे. या शिवाय दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केलं आहे,

दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या दरम्यान होणार आहे, असंही शरद गोसावी यांनी सांगितलं.

दरम्यान, लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे 40 ते 60 गुणांसाठी 15 मिनिटे अधिक वेळ, 70-100 गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास जास्त वेळ देण्यात येणार आहे. कोरोनाचा विचार करून आवश्यक काळजी घेतली जात असून झिग झॅक पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाची भीती कमी होईल.


 

Leave a Comment