माहितीच्या अधिकारात उघळ; मुख्यमंत्री सहायता निधी, विलास शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश.


नांदेड, दींनाक – 03 जानेवारी 2022 – जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील वसूर या गावचे माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. विलास प्रतापराव शिंदे यांनी मुख्यमंत्री सचिवालय यांच्याकडे माहितीचा अधिकार 2005 अन्वये अर्ज करून मुख्यमंत्री सहायता निधी बाबत विचारना केली, सतत पाठपुरावा करून माहिती देण्यास प्रशासनाला भाग पाडले, त्यांनंतर मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडून सविस्तर माहिती देण्यात आली, त्यात त्यांनी रूग्णालये, रेल्वे मजूरी भाडे, वैद्यकीय शिक्षण, इ.अशा बाबींवर खर्च दाखवला आहे.

1) मुख्यमंत्री सहायता निधी कोविड – १९ या बँक खात्यात 31/08/2020 पर्यंत एकूण रक्कम 562,60,07,406/- ( पाचशे बासष्ठ कोटी, साठ लाख, सात हजार, चारशे सहा रूपये ) ईतकी देनगी रक्कम जमा झाली आहे. 2) 128,48,42,316 एकशे अठ्ठावीस कोटी, अठ्ठेचाळीस लाख, बेचाळीस हजार, तिनशे सोळा रूपये ) ईतकी रक्कम खर्च करण्यात आली आहे तर  3) शिल्लक रक्कम 4,34,11,650,90 ( चारशे चौतीस कोटी अकरा लाख पासष्ठ हजार नव्वद रूपये ईतकी रक्कम 31/08/2020 पर्यंत शिल्लक दाखविली आहे, त्या मुळे सामान्य माणसाला ही माहिती मिळाली आहे, माहिती अधिकार कार्यकर्ते सामान्य माणसाला न्याय, हक्क, अधिकार, शाकीय योजनेची माहिती, त्यावर कशी अमल बजावणी होते या बाबत नेहमी कार्य करीत असतात, शिंदे यांनी यापूर्वी देखील अनेक अर्ज लाऊन जनतेला माहिती अवगत करून दिली आहे, त्या मुळे सामान्य माणसाने अश्या कार्यकर्त्यांना साथ दिली पाहिजे, ज्यातून अधिक काम करण्याची हिम्मत मिळेल.


 

Leave a Comment