आमदार चंद्रिकापुरे यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेत्या हिना चा सत्कार संपन्न.


  • तालुक्यातील क्रीडा संकुल येथे 2 कोटी रुपयाचे निधी मंजूर करून मुलांना सोई सुविधा उपलब्ध करू  

सडक अर्जुनी, गोंदिया, दिंनाक – 04 फेब्रुवारी 2022 – आज दुपारी कोहमारा येथील आमदार कार्यालयात कु. हिना कैलास मुनिश्वर मु. केसलवाडा या सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थिनीं चा आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडू विद्यार्थीनीने राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तरप्रदेश व गोवा येथे युथ गेम कॉन्सील ऑफ इंडिया ने आयोजित केलेल्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेऊन सुवर्णपदक प्राप्त करुन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावल्याबद्दल तीचा जाहिर सत्कार आमदार चंद्रिकपुरे यांच्या हस्ते आमदार कार्यालयात करण्यात आला आहे.



यावेळी प्रामुख्याने उपस्थित आमदार मनोहर चंद्रीकापुरे अर्जुनी/मोर. विधानसभा क्षेत्र, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश चुऱ्हे, देवचंद तरोने, मंजुताई चंद्रिकापुरे, वंदनाताई डोंगरवार, रजनिताई गिरहेपुंजे, आनंद अग्रवाल, डॉ रुखीराम वाढई, देवाजी बनकर, कामिनी कोवे, शाईस्ता शेख, प्रियंक उजवने, अतुल फुले, दानेश साखरे, समीर आरेकर, दीक्षा शहारे, मंजूषा बारसागडे, भोला कापगते, आगासे व अन्य कार्यकर्ते पत्रकार बंधु उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन व आभार दुलाराम चंद्रिकापुरे यांनी केले.

हिना पुन्हा नेपाळ येथे खेळण्यासाठी जात आहे, अश्यात हिनाला आर्थिक मदतीची गरज आहे, हिना च्या वडिलांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तिला तुमच्या मदतीची गरज आहे, आमदार चंद्रिकापुरे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, त्याच बरोबर तालुक्यातील क्रीडा संकुल येथे 2 कोटी रुपयाचे निधी मंजूर करून मुलांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्या बाबद सांगितले.


 

Leave a Comment