जिल्हा परिषद डव्वा 7 उमेदवार, जनतेची पहिली पसंत कोण ? 3 उमेदवारात टक्कर!


सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे – महाराष्ट्र केसरी न्यूज ) दिनांक – 19 डिसेंम्बर 2021 – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान दिनांक 21 रोजी सम्पन्न होणार आहेत, यात तालुक्यातील 4 जिल्हा परिषद तर 8 पंचायत समिती करिता निवडणूक होणार आहे, त्यातच आज दिनांक 19 रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत, अश्यातच डव्वा जिल्हा परिषद चा जनतेचा पसंदीदा नेमका कोणता पक्ष? आणि कोणता? उमेदवार आहे, या कडे तालुक्यातील सर्व पक्षाचे व उमेदवारांचे लक्ष वेधले आहे.

त्या मुळे वरील फोटोत दिलेल्या प्रमाणे जनतेची पसंती दिसून येत आहे, जिल्हा परिषद डव्वा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गड आहे, या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कणखर नेतृत्व करणारे नेते गंगाधर परसुरामकर हे जिल्हा परिषद सदस्य होते, त्यातच नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अब्रु परसुरामकर यांच्या खांद्यावर आहे, सर्वत्र जनतेत चर्चा रंगली असून उमेदवारांची धाक धुक चालू आहे, गंगाधर परसुरामकर मोठ्या संख्येने निवडून येणार होते, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या तिकीट वितरण प्रणालीत चेहरा पाहून उमेदवार आणि तिकीट वाटप केल्याने अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या उमेदवारी साठी रुसलेले कार्यकर्ते बंडखोरी करीत पक्ष सोडून आता भाजप पक्षाला मदत करीत असल्याची चर्चा आहे.

एकंदरीत याचा फायदा भाजप चे उमेदवार डॉक्टर भुमेश्वर पटले यांना होणार आहे, या पूर्वी ते 54 मतांनी पराभूत झाले होते, भाजप पक्ष मोठा आणि लोक प्रिय असल्याने टक्कर जोरदार होणार आहे, याचा फायदा काँग्रेस पक्षाचे उमेदवार दिनेश जगन्नाथ हुकरे यांना सुद्धा होऊ शकते कारण “दो बिल्ले की लडाई मे तिसरे का फायदा” हे मन प्रचिती आहे, नाना पटोले चे नजीक चे कार्यकर्ते आणि ओबीसी चे तालुका अध्यक्ष असलेले हुकरे यांना सुद्धा ओबीसी चा फायदा होऊ सकते मात्र नाराज ओबीसी मतदान करणार की नाही यात मात्र शंका कुशंका वेक्त केली जात आहे.

परंतु प्रत्येक पक्षाशी जुडलेला ओबीसी समाज निवडणुकीवर बहिष्कार करू शकत नाही, ही त्यातील सत्यता आहे, सांगायचं म्हणजे “जिकडे नोट तिकडे वोट” अशी डव्वा जिल्हा परिषद ची लढत होणार असुन भाजप चा उमेदवार जनतेच्या प्रथम पसंतीस असल्याची चर्चा तालुक्यात आहे, डव्वा जिल्हा परिषद अंतर्गत 7 उमेदवार उभे आहेत, यात मतदान सुद्धा विखुरले जाण्याचे चिन्ह आहे, मात्र जनतेच्या मानत नेमकं काय आहे ? ते मतपेटी उघडल्या नंतर समोर येईलच…..


 

Leave a Comment