जिल्हा परिषद शेंडा 6 उमेदवार, जनतेची पहिली पसंत कोण ? 3 उमेदवारात टक्कर!


सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे – महाराष्ट्र केसरी न्यूज ) दिनांक – 19 डिसेंम्बर 2021 – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान दिनांक 21 रोजी सम्पन्न होणार आहेत, यात तालुक्यातील 4 जिल्हा परिषद तर 8 पंचायत समिती करिता निवडणूक होणार आहे, त्यातच आज दिनांक 19 रोजी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत, अश्यातच शेंडा जिल्हा परिषद चा जनतेचा पसंदीदा नेमका कोणता पक्ष? आणि कोणता? उमेदवार आहे, या कडे तालुक्यातील सर्व पक्षाचे व उमेदवारांचे लक्ष वेधले आहे.

त्या मुळे वरील फोटोत दिलेल्या प्रमाणे जनतेची पसंती दिसून येत आहे, जिल्हा परिषद शेंडा हा छेत्र या पूर्वी काँग्रेस पक्षाचा गड होता, मात्र काँग्रेस पक्षाने नवीन उमेदवाराला तिकीट दिल्याने जुने उमेदवार नाराजीत आहेत, सांगायचं म्हणजे जरी काँग्रेस पक्षाचा गड असलेला छेत्र आता काँग्रेस च्या हातात नाही, कारण गेल्या जिल्हा परिषद सदस्य उमेदवाराणे जनतेच्या संमश्याचे निराकरण न केल्याने नागरिक काँग्रेस पक्षाशी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे, अश्यात कॉंग्रेश पक्षाचे नवीन उमेदवार निवडून येईलच असे नाही, शेंडा जिल्हा परिषद छेत्रा साठी तब्बल 6 महिलां विविध पक्षा कडून उमेदवार अशुन जनतेची पहिली पसंती शिवसेनेच्या उमेदवार शिल्पा लोमेश मुंगूलमारे या आहेत.

या पूर्वी देखील शिवशेनेचे उमेदवार 150 ते 200 मतांनी विजय पासून पराभूत झाले होते, त्या मुळे शिव शेनेचे उमेदवार यावेळी नक्की निवडुन येईल अशी चर्चा सर्वत्र आहे, मात्र या भागात शिवसेनेचे नेते जनतेच्या मनात पाहिजे त्या थरातून उतरले नसल्याने अनेक कार्यकर्ते अवेध कारभारात लिप्त असल्याचा फटका शेनेला होऊ शकते, अश्यातच त्यांना टक्कर देण्यासाठी भाजप च्या महिला उमेदवार सुद्धा उभ्या आहेत मात्र या भागात भाजप ला भरगोस मत घेणे अशक्य नल्याचे मत मतदाता वेक्त करीत आहेत.

कारण सडक अर्जुनी ते रेंगेपार मार्गाचे काम गेली अनेक वर्षे पासून रखडले असल्याने भाजपला या भागात मतदातांकडून ना पसंती वेक्त केली जात आहे, शेंडा छेत्र हा विशिष्ट समाज बांधवांनी भरलेला आहे, त्या मुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार छाया देवचंद टेकाम यांच्यासाठी मोलाचे ठरणार आहे, सांगायचं म्हणजे राष्ट्रवादी पक्षाला एकदा चान्स आणि या भागाचा विकास अशी दुसरी पसंती ची चर्चा जनतेत रंगली असून उमेदवारांची धाक धुक चालू आहे, सांगायचं म्हणजे “जिकडे नोट तिकडे वोट” असा देखील समीकरण आहे, शेंडा जिल्हा परिषद ची लढत देखील काट्याची होणार असून शिवशेनेचा उमेदवार जनतेच्या प्रथम पसंतीस असल्याची चर्चा या भागात आहे, शेंडा जिल्हा परिषद अंतर्गत 6 उमेदवार उभे असून यात मतदान सुद्धा विखुरले जाण्याचे चिन्ह आहे, मात्र जनतेच्या मनात नेमकं काय आहे ? ते मतपेटी उघडल्या नंतर समोर येईलच…..


 

Leave a Comment