आज सौन्दड येथे “झुंज काळ्या मायेची” नाट्य प्रयोग


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 18 नोव्हेंबर 2021 – तालुक्यातील ग्राम सौन्दड येथे आज खास कार्तिक निमित्ताने झुंज काळ्या मायेची या नाट्य प्रयोगा चे 1 ते 3 अंक बजरंग नाट्य मंडळ तेली समाज सौन्दड च्या वतीने सार्वजनिक हनुमान मंदिर बाजार चौक येथे 09 वाजता होणार आहे, तर उद्या 12 वाजता गोपाल काला आणि सायंकाळी 06 वाजता पासून महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, तरी गावातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दरवर्षी उपस्थित राहतात, गेली 26 वर्षे पासून सातत्याने तेली समाजाने ही परंपरा जपत निरंतरपणे कार्य चालू ठेवले आहे, तसेच दरवर्षी काकड आरती देखील या ठिकाणी मोठ्या उत्साहात केली जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा नाटकाचे प्रयोग या ठिकाणी होणार आहे, झुंज काळ्या मायेची अर्थात संघर्ष बळी राज्याचा असे आहे, गावातीलच तेली समाजाचे कलावंत या नाटकात काम करीत असून आपल्या अंगी असलेल्या कलेचे प्रदर्शन दरवर्षी खास कार्तिक निमित्ताने करतात, तर इतर समाजातील नागरिक या ठिकाणी महाप्रसादाचे आस्वाद घेण्यासाठी जमतात, विशेष सांगायचं म्हणजे कार्तिक पौर्णिमा नंतर ग्रामीण भागात लग्न समारंभाला सुरवात होते.


 

Leave a Comment