राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर शहर – ग्रामीणचा स्नेह समारोह संपन्न.


नागपूर, दिनांक 17 नोव्हेंबर 2021 – आज सातवचन लाँन, वर्धमान नगर नागपूर येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष नागपूर शहर व ग्रामीण च्या वतीने आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता स्नेहमिलन समारोह खा. शरदचंद्र पवार, खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संबोधित करतांना श्री पवार म्हणाले की, केंद्र सरकार हि शेतकरी व शेतमजूर विरोधी असुन मागील दोन वर्षांपासून लहानापासुन ते ८० वर्ष वयाचे हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत आंदोलनावर बसला आहे. शेतकरी वर्गांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा आहे हे आंदोलन जितके दिवस चालेल तेवढे दिवस आम्ही सोबतच आहोत.

सर्वसामान्य लोकांना महागाईच्या खाईत लोटवणारीह्या सरकार चे लोक मागील सरकारच्या काळात १ रुपया जरी पेट्रोल व डिझेल किंवा महागाई वाढली तर रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आता हेच लोक वस्तुंच्या चार पट्टिने किंमत वाढवीत आहेत. केंद्र सरकार राज्याला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्टातील सत्ता गेल्याने राज्यातील नैराश्य आलेले काही नेते धमक्या देऊन केंद्र सरकार च्या मदतीने केंद्रीय संस्थाचा गैरवापर करणे सुरु आहे. पण आम्ही याला घाबरणारे नाही. कार्यकर्त्याच्या शक्तीने, संघटनेने व एकीने नागपुर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खासदार प्रफुल पटेल यांच्या सहकार्याने फडकवुन दाखवु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार प्रफुल पटेल म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेब यांच्या नागपुर आगमनाने कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण झाला आहे. आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये याचा चांगला परिणाम पहायला मिळेल, नागपूरमध्ये तुमच्या सामुदायिक ताकदीतून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्यानंतर, सबंध विदर्भाचे चित्र बदलण्याची प्रक्रिया नागपूरमधून होईल याची मला खात्री आहे. तुम्ही एकटे नाही, आम्ही सर्व तुमच्यासोबत अखंड आहोत.

यावेळी कार्यक्रमात मा. खा.  शरदचंद्र पवार, खा. प्रफुल पटेल सोबत माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार राजेंद्र जैन, मोहिते पाटील, दूणेश्वर पेठे, मधुकर कुकडे, शब्बीर, अहमद विद्रोही,  दीनानाथ पडोळे, प्रकाश गजभिये , नाना पंचबुद्धे,  धनंजय दलाल,  जयंत वैरागडे, ईश्वर बाळबुद्धे,  जानबा मस्के,  जावेद हबीब,  वेद प्रकाश आर्य,  बजरंग सिह परिहार,  राजाभाऊ ताकसांडे,  अनिल अहिरकर,  गंगाप्रसाद ग्वालवंशी,  शेखर सावरबांधे, श्रीमती आभा पांडे,  प्रवीण कुंटे पाटील,  वर्षाताई शामकुळे,  प्रशांत पवार,  दिलीप पनकुले,  महादेव फुके,  सुरेश गुडघे पाटील, श्रीमती लक्ष्मीताई सावरकर,  शैलेंद्र तिवारी,  सुरेश कर्णे,  रविनिश पांडे,  गुलशन मुनियार,  अशोक काटले,  सुखदेव वंजारी,  राजेश पाटील,  मुन्ना तिवारी, शैलेंद्र पांडे, श्रीमती प्रमिला टेमभेकर,  महेंद्र भांगे,  रिजवान अंसारी सहित मोठ्या संख्यने कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते .


 

Leave a Comment