सट्टा पट्टी घेणाऱ्या ३ आरोपी सह १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.


गोंदिया, दिनांक १८ नोव्हेंबर २०२१ – पोलीस अधीक्षक गोदिया विश्व पानसरे यांचे मार्गदर्शनाखाली अवैद्य सटटा घेणा-या आरोपींवर कारवाई करण्यासाठी दिनांक १७/११/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक योगेश पारधी पोस्टे तिरोडा हे शहरात पेट्रोलिंग
करीत असताना २१ : ०० वा. सुमारास गोपनीय सुत्रधार कडुन माहीती मिळाली की, महात्मा फुले वॉर्ड तिरोडा येथील एका घरातील मागील खोलीमध्ये काही ईसम बसुन लोकांकडुन मोबाईल वर सटटयाचे आकडे लिहुन पैसे घेऊन हारजीतचा जुगार खेळवित आहेत.

या माहीती वरुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे संबंधीत ठिकाणी रेड केली असता १) संदीप चंदनदास गजभिये रा. महात्मा फुले वॉर्ड तिरोडा २) सुरेश चमरु घोडमारे रा. संत कवरराम वार्ड तिरोडा ३) डेव्हिड रविकिरण बडगे रा. आंबेडकर वार्ड तिरोडा हे लोकांकडुन पैसे घेवुन मोबाईल वर सटटा चे आकडे लिहुन हारजीतचा जुगार खेळवितांनी मिळुन आल्याने त्यांच्या जवळुन १) ४ मोबाईल हँडसेट २) २ कॅलकुलेटर ३) १ लाकडी टेबल ४) २ चेअर ५) ५ दाटपेन ६) नगदी ६,००० रु. ७) २ मोटर सायकल
८) सटटाचे आकडेचा हिशोब चे कागदपत्रे असा एकुण १,०४,७२५ रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील सर्व आरोपीविरुध्द कलम ४,५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम सह कलम १०९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात आरोपीतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई ही विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक गोंदिया, नितीन यादव उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा यांचे मार्गदर्शनाखाली पोनि योगेश पारधी महिला पोउपनि राधा लाटे, ” नापोशि श्रीरामे, बर्वे, वाढे चानापोशि कहालकर यांनी पार पाडली.


 

Leave a Comment