गोंदिया, दिनांक – 13 ऑक्टोबर 2021 – आज 13 आँक्टोबंरला सायकांळी 6 वाजेच्या सुमारास 10 हजार रुपयाची लाच घेतान्हा एका आरोपीला एसीबी च्या टीम ने रंगेहाथ पकडले आहे. जिल्हाधिकारी गोंदिया यांचे अतिरिक्त कार्यभार असलेले स्वीय सहाय्यक व दंड शाखेचे अव्वल कारकून राजेश अच्युत्तन मेमन असे आरोपी चे नाव आहे.
तक्रारदाराचे हार्डवेयर व भांडे विक्रीचे दुकान असून वडिलांच्या निधनानंतर वडिलांच्या नावे असलेल्या किरकोळ फटाका विक्री दुकान परवान्याचे नुतनीकरण व हस्तातंरण करण्याकरीता आवश्यक कागदपत्रासह अर्ज केला होता.
परंतु मेमन यांनी या करीता 10 हजाराची मागणी केली होती. काही दिवसांनी परत तक्रारदार हे बँकेत 900 रुपये भरल्याची चालान पावती जमा केली होती. परत आज परवाना हस्तांतरणकरीता विचारपूस करायला आज गेले असता मेमन यांनी तक्रारदारास 11 हजार रुपयाची मागणी केली. परंतु तक्रारदारास लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी आज 13 आँक्टोंबरला लाचलुचपत विभागात तक्रार नोंदवली.
त्या तक्रारीची तात्काळ दखल घेत लाचलुचपत विभागाने सापळा रचत पंचासमक्ष 10 हजाराची तडजोडी अंती मागणी करुन ती रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणात गोंदिया लाचलुचपत विभागाच्या वतीने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करुन आरोपीस ताब्यात घेतले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वातील त्यांच्या चमूने केली.