नवेगाव/नागझिरा व्याघ्र प्रकल्पात होणा-या अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण केव्हा लागणार ?


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – १४ ऑक्टोबर २०२१ – गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा निसर्गाने नटलेला असून सर्वाधिक भाग हा वनांनी व्यापलेला आहे. जैवविविधतेने नटलेला व वन्यप्राण्यांचे वास्तव्याने तसेच नैसर्गिक संपदेने नटलेल्या या व्याघ्र प्रकल्पाची सफारी करण्यासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

याशिवाय आमगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी या तालुक्यातील सर्वाधिक भाग वनसंपदांनी व्यापला आहे. त्यामुळे या परिसरात वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार बघायला मिळतो. परंतू वन्यप्राण्यांच्या शिकारीवर अजूनही अंकुश लावता आलेला नाही. तसेच अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. अवैध वृक्षतोड ही बाब वनविभाग व वन्यजीव विभागाच्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत आहे. पण त्यावर नियंत्रण राखण्यात विभागाला यश आले नाही.

वन्यजीव सप्ताहाच्या तीन दिवस आधी नागझिरा अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पातील मंगेझरी, कोडेबर्रा गाव नागझिरा अभयारण्याला लागून असून मंगेझरी, कोडेबर्रा येथील काही वनतस्करांनी सागवान लाकडांची मेटॅडोर भरून तिरोडाकडे जात असतांनी नागझिरा अभयारण्यातील फिरते पथकातील एस.बी.मेहर गस्तीवर‌ असतांनी मेटॅडोर थांबवून चौकशी केली असता सागवान लाकडे भरलेली गाडी जप्त केली होती.

आणि याच कालावधीत १ ते ७ आक्टोंबर दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा केला गेला. पण अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे वन्यजीव सप्ताह साजरा करून वनसेवेत काम करण्याची संधी मिळाली म्हणून आपल्याच वनकर्मचा-यांची पाठ थोपाटण्यात अर्थ काय? वन्यजीव सप्ताहाची गरज नसून वन्यजीव व वनांचे सुरक्षेची गरज आहे.

वन्यजीवावर आधारित असे उपक्रम वन्यजीव विभागाने हाती घेतले असले तरी यावर्षी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमात राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण अधिकरण नवी दिल्ली च्या वतीने टायगर फाॅर इंडिया या उपक्रमात रॅली आॅन व्हीलचे आगमनप्रसंगी नवेगाव-नागझिरा व्याघ्र संरक्षण प्रकल्प व राष्ट्रीय उद्यान यांचे वतीने आयोजित कार्यक्रमात वनविभागाचे रॅली आॅन व्हीलचे जंगी स्वागत करण्यात आले.

वास्तविक स्थानिक अधिकारी स्वागत करू शकत होते, पण बाहेरून आलेल्या रॅली आॅन व्हीलचे पाहुण्या अधिकां-यांच्या स्वागत समारोहाचा तोरा दाखविण्यासाठी नवेगाव नागझिरा अभयारण्यातील कर्मचारी यांची मोटारसायकल रॅली काढून जंगल वनतस्करांचे स्वाधीन सोडले ही उठाठेव करण्याची काय आवश्यकता होती. विशेष म्हणजे, ज्या गावात कार्यक्रम घेतला तर या गावचे स्थानिक सरपंच हे वन संरक्षण समितीचे अध्यक्ष असूनही त्यांना बोलावण्यात आले नाही. कार्यक्रम आटोपते केले.

सदर वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाला स्थानिक सरपंचांना डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. वन्यजीव व वनविभागाला स्थानिक लोकसहभागाची गरज नसल्याची खंत नवेगावबांध चे सरपंच अनिरुद्ध शहारे यांनी व्यक्त केली. तसेच उपसरपंच रघुनाथ लांजेवार यांनी सांगितले की, मागिल २५ वर्षांपासून ग्रामपंचायत मध्ये सरपंच, उपसरपंच अशी पदे भुषविली असून मला ही बाब पहिल्यांदाच बघायला मिळाली. लांजेवार यांनी आठवण करून दिली की, नवेगाव राष्ट्रीय उद्यानात महामहीम राज्यपाल आले असता यांचे स्वागत करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचे नाव सुचविताच राज्यपाल महोदयांनी त्या अधिका-याला रोखून स्थानिक सरपंचाला बोलाविले नाही काय? असे बोलताच अधिका-यांची धावपळ सुरू झाली.

तेव्हा सरपंचांना आणण्यासाठी वन अधिका-यांनी नवेगावबांध येथील सरपंच सौ.खंबाबाई मडावी यांना आणले तेव्हा प्रथम सरपंचाकडून स्वागत स्विकारले. राज्यपाल महोदयांनी आपले भाषणात सांगितले की,देशात व राज्यात कोठेही होणा-या गावातील कार्यक्रमात प्रथम नागरिक सरपंच असतो. अशी अधिका-यांची कानउघाडणी केली होती. हे विशेष. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प अंतर्गत बाजार समिती नवेगावबांध येथे वन्यजीव सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आर.एम. रामानुजम, प्रमुख अतिथी ए.एस.अग्रवाल,प्रल्हाद यादव , उपसंचालक पूनम पाटे, उपविभागीय अधिकारी दादा राऊत, उपवनसंरक्षक वनविभाग प्रादेशिक पी.एस.आत्राम, व्याघ्र मानद वन्यजीव संरक्षक मुकुंद धुर्वे,रूपेश निंबार्ते यांचा सहभाग होता.तसेच लोकपाल गहाणे, रामदास बोरकर पत्रकार,संजीव बडोले पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजक नवेगाव राष्ट्रीय उद्यान चे वनक्षेत्र अधिकारी डोंगरवार होते.

वाघांची संख्या घसरणीवर


नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सन २०१३-१४ मध्ये वाघांची संख्या ११-१२ होती. आज ती संख्या ४-५ वर आली असल्याने वनअधिकारी यांचेसाठी चिंतनाचा विषय ठरला आहे. आता वनअधिकारी व कर्मचारी स्वत: च वाघाचे संरक्षण व संवर्धन करू शकतो, असे वरिष्ठ अधिकारी जबाबदारीने सांगत फिरत आहेत. वास्तविक लोकसहभागाशिवाय जंगलाचे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन होऊ शकत नाही. पण वरिष्ठ अधिकारीच अवैध वृक्षतोड करणा-यांना सहकार्य करीत असतील तर लोकांचे सहकार्य कशाला? अशी देखील चर्चा आहे.

अवैध वृक्षतोडीवर पांघरूण


नवेगाव पार्क मध्ये सन २०१५ मध्ये खडकी बाम्हणी कंम्पार्टमेंट नं. ०५६५ व्याघ्र प्रकल्प सिमेच्या आत निशानी गेट ३०० मी. वर ५-६ गोलाईचे सागवान (१२) झाडे कापले होते. तसेच नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सहवनक्षेत्र ४ मधील थाडेझरी बिट कंम्पार्टमेंट नं.९८ मध्ये मामा-भाषा पहाडीला लागून सन २०१७-१८ मध्ये आ-याने सागवान झाडे पाडून ५० झाडे विकले गेले. तसेच नवेगाव पार्क मध्ये कालीमाटी, कवलेवाडा चे सन २०११-१२ मध्ये पुनर्वसन झाले असता सन २०१५ मध्ये १० ते १६ जुन दरम्यान ४-५ फुट वाढलेला कुसन गवत पुनर्वसीत लोकांनी आग लावून जाळला होता.  त्याठिकाणी धान पेरणी केली. आणि जुन ते आक्टोंबर मध्ये धान कापून नेले. पण वन्यजीव विभागाने कसलीही कारवाई का केली नाही हा देखील चर्चेचा विषय आहे.

जंगलातील रिसोड वन्यजीवांच्या जीवावर


यु मुंबा रिसोट साकोली तालुक्यातील जांभळी (खांबा) वरून दोन किमी पश्चिम दिशेला नागझिरा सिमेवर असून दोन किमी थ्री फेज लाईन जंगलातून नेऊन नागझिरा सिमेलगत चार मी. वर ट्रान्सफार्मर (डि.पी.) उभारली गेली. सदर रिसोड मधील पाणी, धुनी, चिकन मटन यांचे पाणी नागझिरा सिमेच्या नालीमध्ये वाहत असते. वन्यप्राणी रिसोडच्या आसपास फिरत असतात. या रिसोडला मंजुरी वनमंत्रालयातील सेक्रेटरीच्या ( सचिवाचे ) दबावाखाली देण्यात आली असल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत, त्या मुळे वन विभागातील असे अनेक प्रकार उघळकीस येऊ शकतात , याची वरिष्ठ पातळीवर तपास होण्याची मागणी आहे.


 

Leave a Comment