खासदार प्रफुल्ल पटेल यांचा पाठपुरावा, 775 कोटी रुपये मिळणार शेतकऱ्यांना.


  • धानाचे प्रलंबित चुकारे व बोनस रक्कमेची प्रतीक्षा संपली.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 07 सप्टेंबर 2021 – आधारभूत धान खरेदी योजणे अंतर्गत 2020-21 खरीप / रब्बी हंगामात राज्यात एकूण एक कोटी बासष्ट लक्ष क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. यापूर्वी राज्य शासनाकडून खरेदी किंमत व 50% बोनस ची रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली होती, या पूर्वी 775 कोटी धानाची व 50% बोनस ची रक्कम येणे बाकी होती.

या प्रलंबित चुकाऱ्या बाबत खासदार  प्रफुल्ल पटेल व मा.आमदार मनोहर चंद्रिकापूरे, माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी अजित पवार उपमुख्यमंत्री व छगन भुजबळ नागरी व अन्न पुरवठा मंत्री यांचे कडे सतत पाठपुरावा केला. त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असतांना देखील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन उर्वरित प्रलंबित असलेली रक्कम रुपये 775 कोटी राज्य शासनाने दि. 06 सप्टेंबर रोजी मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ कडे हस्तांतरित केले आहेत.

येत्या चार दिवसात सदर रक्कम शेतकऱ्यांचे खात्यावर जमा होईल. गोंदिया जिल्ह्यास खरेदी केलेल्या धानाची व बोनसची एकूण रक्कम रुपये 405.40 कोटी आहे. यापैकी 233 कोटी यापूर्वीच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने त्यांचे खात्यावर जमा केले आहे. उर्वरित 172.40 कोटी रुपये जिल्ह्यास आज प्राप्त झाले आहे. यापैकी 133 कोटी रुपये जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांना तर 39.40 कोटी रुपये आदिवासी विकास महामंडळ यांना राज्यशासना कडून प्राप्त झाले आहे.


 

Leave a Comment