ग्रामीण भागात बैल पोळा मोठ्या उत्साहात साजरा.


गोंदिया, अर्जुनी-मोर , संतोष रोकडे, दिनांक – 07 सप्टेंबर 2021 – कोरोनाविषाणूच्या सावटाखाली अर्जुनी-मोर तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला, यांत्रिक युगात घटत्या पशुधनामुळे तसेच शेतीचे कामे अद्यावत यंत्राने करण्यात येत असल्याने गावोगावी बैलांची संख्या कमी झालेली आहे.

शेतकऱ्यांचा मुख्य सन व शेतकऱ्यांचे उदर निर्वाहाचे मुख्य साधन असलेली शेती कसण्यासाठी बैलांचा वापर केला जात होता, मात्र दिवसेंदिवस शेतीच्या मशागतीची सर्व कामे यंत्राने करण्यात येत असल्यामुळे गावखेड्यातील बैलांची संख्या अगदी अल्प झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा मुख्य सण असलेल्या बैलपोळ्याला बैलांचे ऋण फॅडन्यासाठी बैलजोडीचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचे जेवण देण्यासाठी अनेक गृहिणींना वाट पाहावी लागली, समोरील काळात गावागावांमध्ये एकही बैलजोडी राहणार नाही काय, अशा प्रकारच्या चर्चा गावखेड्यात केल्या जात आहेत, तालुक्यात च नव्हे तर संपूर्ण राज्यात बेल पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.


 

Leave a Comment