आता पक्षात गुटबाजी चालणार नाही, जो काम करेल त्याचा विचार केला जाईल – नाना पटोले.


  • त्यामुळे पटोले यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एका समोर आले आहेत.

गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – ०६ सप्टेंबर २०२१ – सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे ०५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात मुख्यतः काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व अन्य कार्यकर्ते मोठ्या शंखेत उपस्थित होते, कार्यक्रमाची वेळ जरी १२ वाजताची अश्ली तरी नाना पटोले कार्यक्रमात तब्बल ०४ वाजता पोहोचले, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे यांनी या बाबद खंत वेक्त केली, त्यातच स्थानिक आमदार आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कामे करीत नश्ल्याचे दरम्यान मंचावरून बोलत होते, त्या मुळे जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाचा पालक मंत्री पाहिजे, स्थानिक परिस्थिती दोनोडे यांनी पटोलेना सांगितली , जिल्ह्यातील व अन्य राज्यातील वरिष्ठ पदाधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते.



दरम्यान सेकडोच्या संखेत कार्यकर्ते देखील उपस्थित होते, कॉन्ग्रेश प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले दरम्यान पटोले म्हणाले, प्रतेकांनी आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावला पाहिजे, आता गुट बाजी चालणार नाही, जो काम करेल त्याचा पक्ष विचार करेल, त्या झेंड्या मध्ये मी तुम्हाला आणि तुम्ही मला दिसणार त्या मुळे प्रतेकानी आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावला पाहिजे, ब्यानर लावण्याची गरज नाही, ज्याला लावयचे आहे त्यांना लाऊ ध्या, असे पटोले बोलत होते, यावेळी मंचावर उपस्थित आमदार अभिजित वंजारी, नामदेवराव किरसान अध्यक्ष गोंदिया जिल्हा, माजी आमदार दिलीप बनसोड , पी जी कटरे सचिव महाराष्ट्र राज्य, अमर भाऊ वराडे सचिव गोंदिया जिल्हा, रत्नदीप दहिवले कार्य अध्यक्ष गोंदिया जिल्हा, ओबीसी कॉन्ग्रेश जिल्हा अध्यक्ष जितेंद्र कटरे , किसान अध्यक्ष जितेश राणे, अल्प संख्यांक अध्यक्ष परवेज बेग, राजेश भाऊ नंदागवळी प्रदेश प्रतिनिधी , दामोदर नेवारे महा सचिव गोंदिया, मधुसुधन दोनोडे तालुका अध्यक्ष, निशांत राउत तालुका उपाध्यक्ष, अनिल राजगिरे शहर अध्यक्ष, पुष्पा खोटेले जिल्हा महिला महासचिव, किरण हटवार तालुका महिला अध्यक्ष व अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते, सडक अर्जुनी तालुका कॉन्ग्रेश पक्षामध्ये एक मत नश्ल्याचे दरम्यान कार्यक्रमा दरम्यान दिसून आले.

मंचावरून जातान्हा नाना पटोले यांना उपस्थित पत्रकार बांधवांनी काही प्रश्न विचारले, पुणे जिल्ह्यातील कदमाकवस्ती येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने महिला सरपंचाला केलेल्या मारहाणीवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीला चांगलाच चिमटा काढला असून महिला सरपंचाला मारहाण करणे निषेधार्ह बाब असून अश्या प्रवृत्तीचे मी समर्थन करत नाही, तसेच हीच राष्ट्रवादीची संस्कृती आहे का? असा टोला देखील लगावला आहे. काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या संस्कृतीत फरक असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पटोले यांच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एका समोर आले आहेत.


 

Leave a Comment