गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 29 ऑगस्ट 2021 – अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी 27 ऑगस्ट रोजी केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रामधील ग्राम पंचायत परसटोला, केशोरी येथे लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय केशोरी ( योगेश नाकडे यांच्या घरी ) व दिनकरनगर येथे सुबोध मुजुमदार यांच्या घरी कार्यकर्ता बैठक करून कार्यकर्ता व लोकांची समस्या जाणून घेतली.
त्यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक अध्यक्ष योगेश नाकाडे पार्टी एफ आर टी शहा, सुबोध मुजुमदार, तेजराम गोटेफोडे, शंकर मालिखामे, प्रफुल मेंढे, सुधीर घुटके, कुंडलिक गोटेफोडे, दुधाराम नेवारे, हिरालाल शेंडे, अनिल लाडे, विनय मड़ावी दयानंद सहकाटे, सुशील गहाणे, विनय शील, विष्णुपद मंडल, सुचित्रा शील,भानुमती सरकार, आर एस तरफदार, सुरेंद्र मजुमदार, अशीत मंडल ,एस आर मंडल ,अंजली दास ,रणजीत मंडळ, ज्ञानेश्वर गेडाम, प्रीतम रामटेके, युवराज गहाणे विकास रामटेके, गोपाल लोथे, भूषण शेंडे, प्रणय शेंडे, अजय टेभूर्ण उपस्थित होते.