लोहिया विद्यालयातील विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत सुयश


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक- 29 ऑगस्ट 2021 – सौन्दड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सौंदड येथून सत्र 2020-2021 मध्ये झालेल्या ईयत्ता 8 वी च्या NMMS परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांपैकी एकूण 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

यामध्ये अंशू भेंडारकर , धीरज भिवगडे, कु.ऋतिका निर्वाण, कु. लीना यावलकर, सम्यक साखरे या 5 विद्यार्थांना ईयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत एकूण 48,000 शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मा.जगदीश लोहिया- संस्थापक- संस्थाध्यक्ष लोहिया शिक्षण संस्था, मा.मधुसूदन अग्रवाल-प्राचार्य, सौ.कल्पना काळे-पर्यवेक्षिका तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून भावी यशाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड होऊन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.


 

Leave a Comment