गोंदिया, सालेकसा, ( राहुल हटवार ) – दिनांक 29 ऑगस्ट 2021 – मागील दोन वर्षापासून 13000 सिंचन विहीर या कार्यक्रमांतर्गत सन 2019 मध्ये तालुक्यातील 75 शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले आहे. मात्र आतापर्यंत सिंचन विहिरी चे पैसे लाभार्थ्यांना देण्यात आले नसून, लाभार्थी शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत.
आज जवळपास 85 लाख रुपयांचे प्रलंबित असून ज्या लाभार्थ्यांनी खाजगी सावकाराकडून व्याजी पैसे आणून कसेबसे तरी सिंचन विहिरीचे काम पूर्ण केले. मात्र आज शेतकऱ्यांना मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी या विभागाचे जण लोकप्रतिनिधी दौऱ्यावर आले की मोठमोठे आश्वासन देऊन निघून जातात मात्र जनसामान्य माणसाचे कैवारी कोण? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे 12 कोटी रुपये वर्धा जिल्ह्यात आले होते, परंतु सदर रक्कम गोंदिया जिल्ह्यात देण्यात आले नसून या जिल्ह्यात जवळपास 90 टक्के शेतकरी हे शेतीच्या भरवशावर आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाने सिंचन विहिरीच्या थकीत रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी मागणी राजू यटरे, श्यामलाल बैठवार, प्रणिता बहेकार, यशोदाबाई यांच्यासह इतर लाभार्थ्यांनी गोंदियाचे जिल्हाधिकारी व तहसीलदार सालेकसा यांच्याकडे मागणी केली आहे.