- होमराज हेमने यांचा हुंडई कार शोरूम वर फसवणुकीचा आरोप, पोलिसात लेखी तक्रार.
गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 14 ऑगस्ट 2021 – अर्जदार होमराज गोमा हेमने यांनी हुंडई कार च्या शोरूम कडून आपली फसवणूक केल्या प्रकरणी गणेशपेठ पोलिस स्टेशनला लेखी स्वरूपाची तक्रार दिनांक – 30 , 07, 2021 ला केली आहे, कंपनीने जुनी गाडी नव्या स्वरूपात विकल्यावरून त्यांच्यावर रितसर कारवाई करण्यात यावी असे नमूद आहे.
इरोज हुंडई मोटर्स प्रा. लि., गायत्री सदन, घाट रोड, नागपूर येथे मोहनिश भिरगडे या सेल्समनच्या माध्यमातून साकोली भंडारा येथील ग्राहक होमराज गोमाजी हेमने यांनी कार बुक केली व कार घेण्यासाठी 17 ऑक्टोंबर 2020 ला त्यांना हुंडई कारची डिलीवरी घेत असताना गाडी पुर्णपणे भरलेल्या अवस्थेत मिळाली.
गाडीचा पेंट काही ठिकाणी नीघलेला होता, ही माहिती वाहन मालक यांनी त्वरीत सेल्समॅन भिरगडे यांच्या लक्षात आणून दिली. त्यावर सेल्समॅन भिरगडे म्हणाले की आमच्या शोरूम मध्ये ही गाडी एका झाडाखाली उभी होती , त्यामुळे त्या गाडीवर धूळ बसला आहे आम्ही गाडीला पॉलिश व वॉशिंग करून तीन तासाता देतो. असे सांगुन ती गाडी वर्कशापला घेऊन गेले अशी माहिती अर्जंदार यांनी दिली.
गाडीची डिलीवरी दिल्यानंतर काही दिवसांनी गाडीचा पेंट आपोआप उडायला लागला, कारण ती पूर्वी पासुनच डॅमेज होती, या विषयावर गाळी मालक यांनी वारंवार शो रूम सी संपर्क करून डिफेक्टीव्ह बदलून देण्यास सांगितले असता नेहमीच आता देतो,
उद्या या अशी खोटी आश्वासने देऊन आतापर्यंत वेळ मारून नेण्याचे काम गैर अर्जदार यांनी केला आहे.
त्या मुळे कंटाळून अर्जदार हेमने यांनी हुंडई कार शो रूम कडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गणेशपेठ पोलिस स्टेशनला नागपूर येथे लेखी स्वरूपाची तक्रार केली आहे, कंपनीने जुनी गाडी नव्या स्वरूपात विकल्यावरून त्यांच्या रितसर कारवाई करण्यात यावे व मला योग्य न्याय मिळावा अशी अपेक्षा हेमने यांनी दिलेल्या अर्जात केली आहे, त्या मुळे नवीन कार खरेदी करतान्हा पुरेपूर आपली शहानिशा करून घेणे गरजेचे आहे.