आ. चंद्रिकापुरे यांच्या हस्ते २०२१ महाआवास अभियानाअंतर्गत तालुकास्तरिय पुरस्काराचे वितरण.



गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – १४ ऑगस्ट २०२१ – महाआवास अभियानांअतर्गत प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजने अंतर्गत सडक / अर्जुनी तालुका स्तरिय पुरस्काराचे वितरण आ. मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते दिनांक १३ ऑगष्ट २०२१ रोजी पंचायत समिती सडक / अर्जुनी येथे करण्यात आले.

महाआवास अभियान २०२१ चे शासनाचे निकषानुसार ज्या ग्रामपंचायतींनी योग्य नियोजन आराखड्यानुसार घराचे विहीत मुदतीत बांधकाम पुर्ण करणे , किचन ओटा , लादी , शौचालय , पाऊस पाणी संकलन व फळझाडे लावणे आदींची पुर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

यामध्ये कोसबी ग्रामपंचायतीस प्रथम पुरस्कार , व्दितीय चिरचाडी ग्रामपंचायतीस व तृतिय पुरस्कार भुसारीटोला ग्रामपंचायतीस प्राप्त झाले. तसेच राज्य पुरस्कृत रमाई / शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रथम पुरस्कार , कोसबी ग्रा.प. , व्दितीय पुरस्कार पाटेकुर्रा तृतिय पुरस्कार कोहमारा ग्रा.प. पुरस्कारासाठी पात्र ठरल्या आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उतकृष्ट काम करणरे लाभार्थी प्रथम पुरस्कार अमृत मारोती तरोणे, कोसबी ग्रा.प. व्दितीय पुरस्कार हिरकना भिमराव चौधरी , पाटेकुर्रा ग्रा.प. , तृतिय पुरस्कार रामचंद्र माधव कोरे , बाम्हणी / खडकी यांना सम्मानित करण्यात आले.

तसेच रमाई / शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम करणारे प्रथम पुरस्कार विलास रामदास वट्टी , बाम्हणी / खडकी , व्दितीय पुरस्कार भुवनलाल गोवर्धन भोयर चिखली ग्रा.प. तृतिय पुरस्कार मंगेश श्रीराम सातभावे बोथली ग्रा.प. यांना सम्मानित करण्यात आले, याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल आशिष कापगते , ग्रामीण गृह निर्माण अभियंता व रमाई / शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल हार्दीक एस . बाम्हणकर , ग्रामीण गृह निर्माण अभियंता यांना सम्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून आमदार महोदयांचे हस्ते सम्मानित करण्यात आले.

गोंदिया जिल्हास्तरावर सडक / अर्जुनी ग्रामपंचायतीस प्रथम पुरस्कार प्राप्त झाले असुन दि .१५ ऑगष्ट २०२१ रोजी पालक मंत्री  नवाब मलीक यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याबद्दल आमदार महोदयांनी गटविकास अधिकारी खुने व सबंधित अधिकारी कर्मचारी यांचे अभिनंदन केले तसेच तालुका स्तरावर पुरस्कार प्राप्त सरपंच , ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले तर गरजू लाभार्थ्यांना प्राथम्याने घरकुल मंजूर न होता घरकुल याद्यामध्ये विविध स्तरावर होणाऱ्या बदलाबाबत नाराजगी व्यक्त केली.

 

पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच / ग्रामसेवक यांचेपासुन प्रेरणा घेवून तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती पुरस्कारासाठी यावर्षी पात्र ठरल्या नाहीत त्यांनी प्रेरणा घेवून पुरस्काराचे निकषानुसार बांधकाम करून आपल्या ग्रामपंचायतींना सम्मान मिळवून द्यावा यासाठी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी मैत्रीपुर्ण स्पर्धा निर्माण करावी असे आवाहन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.

ग्रामपंचायतींनी घरकुलाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल पुरस्कार प्राप्त केले असले तरी अनेक ग्रा.प. क्षेत्रातील नागरिकांचे घरकुलाची कामे विविध कारणासाठी अपुर्ण आहेत, त्याची मुख्य कारणे म्हणजे लाभाथ्यांना वेळेवर निधी प्राप्त न होणे , अकुशल कामाचे रुपये 18 हजार लाभार्थ्यांना चुकीच्या नोंदीमुळे न मिळणे यासारख्या बाबी मोठ्या प्रमाणावर होत असल्याच्या तक्रारी लाभार्थ्यांकडून होत आहेत , तरी याबाबत गट विकास अधिकारी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आमदार महोदयांनी व्यक्त केली आहे.


 

Leave a Comment