- उपस्थित सर्व पाहुणे आणि पत्रकारांचे “मानवाधिकार रत्न” प्रमाण पत्र देत सत्कार
गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 07 ऑगस्ट 2021 – तालुक्यातील ग्राम डुग्गीपार येथील प्रसिध्द एक्वा एडवांचर व्हाटर पार्क येथे 06 ऑगस्ट रोजी रुद्रसागर न्यूज पेपर चे प्रथम आणि महाराष्ट्र केसरी न्यूज चे तिसरे वर्धापन दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर अध्यक्ष स्थानी मे. मोदी सोनालिका सेंटर साकोली चे संचालक संदीप मोदी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे हर्ष मोदी भाजप युवा महामंत्री गोंदिया जिल्हा, मंजू ताई डोंगरवार माजी प.स. सदश्य गोंदिया, रंजु ताई भोई ओबीसी संघर्ष कृती समिती महिला तालुका अध्यक्ष, शुभांगी ताई वाढवे सामाजिक कार्यकर्ता सौन्दड, चरणदास शाहारे अध्यक्ष गाव तंटामुक्ती सौन्दड, सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या तेलचित्राचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तर उपस्थित पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले, मंचावर उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन केले, वर्धापन दिन आणि संपादक बबलू मारवाडे यांचे जन्मदिन एकाच दिवसी असल्याने केक कापन्यात आला, सर्वांनी जन्मदिनाच्या व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी पत्रकार आणि संपादक सुशील लाडे, पत्रकार अश्लेष माळे, पत्रकार व संपादक सौरभ गोस्वामी , पत्रकार वेद परसोडकर, पत्रकार आकाश बावनकुळे, पत्रकार व संपादक देवेन्द्र दमाहे, व अन्य पत्रकार , आणि पाहुणे उपस्थित होते सर्वांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, व मानवाधिकार रत्न प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले, भोजन नंतर स्विमिंग चे आयोजन व्हाटर पार्क येथे करण्यात आले होते, कार्यक्रमाचे आयोजन छोट्या स्वरूपाचे होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्लेष माळे यांनी केले अशी कार्यक्रमाची सांगता झाली.