सोशल मीडियाच्या मदतीने हरवलेला पर्स तिने केला परत, महिला बस कंडक्टर चे कार्य कवतुकास्पद !


  • पैश्यांची गरज असतांन्हा देखील तिने केली पर्स परत…

भंडारा, दिनांक – 08 ऑगस्ट 2021 – भंडारा ते नागपूर या बस मध्ये महिला कंडक्टर म्हणून करुणा गोंडाने या कार्यरत होत्या, बस नागपूर बस स्थानका वरून भंडारा कडे येण्यासाठी निघाली, इतक्यात एका दुचाकी चालकाच्या खिशातून पर्स जमिनीवर पडल्याचे दिसले, बस कंडक्टर करुणा गोंडाने यांनी बस थांबवत पर्स उचलला तितक्यात दुचाकी चालक पुढे निघून गेला होता, सदर वेक्ती बाबद कुणाला काहीच माहिती नव्हती, करुणा यांनी पर्स ची तपासणी केली असता त्यात चक्क एक हजार आठशे दहा रुपये होते, तर पास पोर्ट, आधार कार्ड, प्यान कार्ड सह अन्य महत्वाची कागदपत्रे देखील होती.

एखादी अन्य वेक्तीला जर हा पेकेट सापडला असता तर त्यांनी परत केला नसता, बस कंडक्टर यांनी तो परत केला, आणि तो परत करण्यासाठी देखील त्यांना कसरत करावी लागली, म्हणजे त्याचे झाले असे की, पर्स मध्ये मिळालेल्या कागद पत्रातून सदर वेक्तीची माहिती समोर आली, त्याला सोशल मीडियावर शोधल्याने संपर्क झाला मग काय कंडक्टर गोंडाने यांनी 1810 रुपये आणि अन्य महत्वाची कागद पत्र असलेला पेकेट सदर वेक्तीला परत केला.

मिहीर लिडबीडे असे त्या युवकाचे नाव सांगितले जाते, लिडबीडे यांना त्यांचे पेकेट मिळाल्या मुळे त्यांनी करुणा ताईचे आभार ! देखील मानले, एवढंच नाही तर पेकेट मध्ये असलेले 1810 रुपये गोंडाने ताईला दिले मात्र त्यांनी घेण्यास नकार दिला, परंतु लिडबीडे यांना समाधान न मिळाल्याने गोंडाने ताईला एक ब्याग गिफ्ट दिली ही घटना 07 ऑगस्ट ची आहे.

आता ही बातमी इथेच संपत नाही, तर इथून इमानदारीने दर्शन घडते हेही तितकेच महत्वाचे आहे, समाजामध्ये वावरणारे सर्वच लोक अशी नाही ? अशी वेक्ती शोधल्याने सापडत नाही, करुणा ताई यांचे अनेक ठिकाणी या पूर्वी सन्मानपत्र , पारितोषिक, आणि सत्कार करण्यात आले, त्याचे कारण असे की त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात बस कंडक्टर असतांहि एका महिलेची प्रसूती बस मध्ये सुखरूप केली होती, त्या मुळे त्यांना दरवर्षी सन्मान पत्र आणि अवॉर्ड देऊन गौरविण्यात येते.

लोकमत सखी सन्मान अवॉर्ड, सकाळ सन्मान सोहळा, नाना पटोले यांच्या हस्ते सत्कार, सावित्रीबाई आलं ऑफ लेडीच भंडारा, धम्मभुसन महाबोधी बहुद्देशीय संस्था अमरावती यांच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला आहे, करुणा गोंडाने या बस कंडक्टर होण्या अगोदर नर्स चे काम करीत होत्या , त्यांचे ते अनुभव कामी आले, करोना काळात बस बंद असल्याने त्यांनी आपले नर्स चे काम सुरू केले होते, त्या शेतीच्या देखील कामाला जातात म्हणजे जगण्यासाठी खूप धळपळ आहे, असे नाही , तर त्याचे कारण काही वेगळे आहे.

  • करुणा गोंडाने यांना तुमच्या मदतीची गरज आहे.

बस कंडक्टर करुणा ताई यांचा मुलगा 20 वर्षाचा आहे, नागपूर मध्ये शिक्षण घेत असतांहि अचानक तो डिप्रेशन मध्ये गेला, त्याच्या शिक्षणा साठी अगोदर आई ने नोकरीवर कर्ज काढला होता, बस कंडक्टर ला कमी पगार असतोय, अगोदर घेतलेल्या कर्जाचे हप्ते कापून उरलेला पगार हातात येतोय, त्यात घर चालवायच की मुलाच्या आजार पणाला खर्च लावायचा असा प्रश्न उपस्थित झाला,  एका व्हाट्सएप ग्रुप च्या मदतीने थोडी मदत मिळाली, तर आर एस एस च्या कार्यालयातून मदत मिळाली मात्र पाहिजे ती मदत होऊ शकली नाही, अनेक नेत्यांच्या संपर्कात गेले मात्र मदत मिळाली नाही,

अशी खंत करुणा ने वेक्त केली, दरवर्षी सत्कार होतात, मात्र आपली अडचण कुणी समजून घेत नाही, कुणी धावून मदत करीत नाही, कुणी माणुसकी दाखवत नाही, अशी खंत मीडिया प्रतिनिधीला माहिती देतान्हा वेक्त केली, आपला मुलगा आजारी आहे, त्याची प्रकुर्ती बरी नाही, पैश्याची अत्यंत गरज असतांहि देखील तिने पैश्याने भरलेला पर्स परत केला , ही इमानदारी कुठे गहान ठेवता येणार काय ? कोरोना काळात  बस कंडक्टर चे काम बंद असल्याने ती दवाखाण्यात आणि शेतीत देखील काम करायची, मुलाच्या आजाराला पैसे गोळा करण्यासाठी तिची ही धावपळ सुरू झाली, मुलगा लहान असताना पती स्वर्ग वासी झाले, आई देखील आजारी आहे, एकट्या बाई माणसाने कसा परिवार चालवावा असा प्रश्न देखील समोर असतांहि तिने आपली इमानदारी कायम ठेवली, आपला समाज तिच्या खरच कामात येईल काय ? की फक्त सत्कार करीत राहील हा देखील प्रश या निमित्ताने उपस्थित होत आहे, करुणा च्या कार्याला महाराष्ट्र केसरीचा सलाम!


 

Leave a Comment