राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या तालुका अध्यक्ष पदी अश्लेष माडे यांची नियुक्ती


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 07 ऑगस्ट – राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या सडक-अर्जुनी तालुका अध्यक्षपदी कोहमारा येथील रहिवासी कवी तथा पत्रकार अश्लेष माडे यांची नियुक्ती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनरावजी तायडे यांच्या आदेशानुसार आशिष पाटील कापगते जिल्हा अध्यक्ष ओबीसी युवा महासंघ गोंदिया यांनी लेखी पत्रकाद्वारे नियुक्ती केली आहे.

त्यांनी नियुक्तीचे श्रेय राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष सेवकभाऊ वाघाये, राष्ट्रीय युवा अध्यक्ष सुभास घाटे, राष्ट्रीय सरचिटणीस राजकुमार घुले, जिल्हाध्यक्ष आशिष पाटील कापगते, तसेच गोंदिया जिल्हा व तालुका कार्यकारिणी ला दिले आहे. अश्लेष माडे यांची राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाच्या तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


 

Leave a Comment