- गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी विक्री विषयावर केली चर्चा.
मुंबई – दिनांक – 07 ऑगस्ट 2021 – आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी 05 ऑगस्ट रोजी मुंबई येथे छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा मंत्री यांचेशी गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी विक्री विषयावर चर्चा केली, यावेळी विजय शिवणकर जिल्हाध्यक्ष रा.काँ. गोंदिया उपस्थित होते.
गोंदिया, भंडारा ,गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात प्रमुख पीक धान आहे. धानाची खरेदी हे केंद्र शासन महाराष्ट्र शासनाचे मदतीने आधारभूत किमतीने आदिवासी सोसायट्या व महामंडळा तर्फे खरेदी करते. परंतु मागील वर्षी धान खरेदी व मिलिंग करिता तसेच धान उचल करण्यास झालेला विलंब यामुळे शेतकऱ्यांना जो त्रास झाला तो पुढील हंगामात होऊ नये म्हणून राष्ट्रवादी चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी मा ना. छगन भुजबळ याना खरेदी पूर्व करावयाचे कालबद्ध कार्यक्रमा बाबत चर्चा करून माहिती दिली.
जसे वेळेवर खरेदी केंद्र सुरू करणे, त्या अगोदर बारदाण्याची व्यवस्था करणे, किंवा शेतकऱ्यांचे स्वतःचे बारदण्यातच खरेदी करणे व बारदाण्याची रक्कम चुकाऱ्यासोबतच देणे ,खरेदी सुरू करताना सोबतच मिलिंग करिता धान उचल करणे जेणे करून केंद्रावर जागेची अडचण जाणार नाही, केंद्रांना खरेदीचा निश्चित खरेदी लक्षांक ठरउन देणे ,नवीन केंद्र वाढविण्यास मंजुरी देणे, असहकार्य करणाऱ्या केंद्रावर निर्बंध लावणे, चुकारे वेळेवर मिळणे इत्यादी बाबीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री महोदयांनी यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार त्या दिशेने कठोर निर्णय घेणार असल्याचे सांगितले.