हर्ष मोदी यांच्या पुढाकाराने लवकरच सौन्दड येथे कोविड चाचणी सुरु होणार


  • सौन्दड येथे पोहोचली १०४ करोना बाधित रुग्ण संख्या तर ८ लोकांचा मृत्यू २२ लोक करोना मुक्त.
  • सध्या ७४ रुग्ण बाधित आहेत तर तपासणी झाल्यास खरी रुग्ण संख्या समोर येणार.

गोंदिया, सडक /अर्जुनी, दिनांक – १९ एप्रिल २०२१ – आज रोजी ग्रामीण रुग्णालय सौन्दड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन कापसे, आणि जिल्हा शेल्य चिकित्सक अधिकारी ( cs ) डॉक्टर अमरीश मोह्बे, तालुका वेधकीय अधिकारी डॉक्टर हर्षवर्धन मेश्राम, यांनी भेट दिली, गेल्या काही दिवसा पासून सौन्दड गावात करोना रुग्णान मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे लक्ष्यात आले, त्या अनुसंगाने गावत अश्लेल्या ग्रामीण रुग्णालयात नियौजन नश्ल्याचे लक्ष्यात आले.



त्याचा पाठपुरावा म्हणून स्थानिक ग्राम पंचायत सदश्य व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री हर्ष विनोद कुमार मोदी यांनी गावातील जनतेच्या हिता संबंधित विविध मागण्यांचे निवेदन तालुका वेधकीय अधिकारी मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शेल्य चिकित्सक अधिकारी , खंडविकास अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले, त्या अनुसरून आज ग्रामीण रुग्णालय सौन्दड येथे गोंदिया जिल्ह्याचे CS आणि DHO त्यांनी व त्यांच्या चमूने भेट दिली. दरम्यान विविध मागण्यांवर चर्चा झाली, त्यात हर्ष मोदी यांच्या मागण्यांवर आश्वासने देण्यात आले.



  • मोदी यांच्या मागण्यावर अधिकार्यांनी दिली आश्वासने.

१ ) ग्रामीण रुग्णालय सौन्दड येथे लवकरात लवकर कोविड चाचणी केंद्र चालू होणार,  २ ) कोविड केअर सेंटर ( CCC ) चालू होणार, ३ ) होम कोरणटाइन अश्लेल्या कोरोना बाधित रुग्णांची, ओक्शिजन लेवल व तापाचा तापमान याची तपासणी होणार, ४ ) १० ते १२ दिवसात अम्बुलेंस ची वेवस्था होणार, ५ ) करोना बाधित रुग्णांना देण्यासाठी ओषद उपलब्ध होणार, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले, दरम्यान उपस्थित मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन कापसे, जिल्हा शेल्य चिकित्सक अधिकारी डॉक्टर अमरीश मोहोबे, तालुका वेधकीय अधिकारी डॉक्टर हर्ष वर्धन मेश्राम, हर्ष विनोद कुमार मोदी , संदीप मोदी, हितेश मेश्राम, भूमेश शिवणकर, व ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टर, अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.



  • हर्ष मोदी यांनी केले आव्हाहन. 

सौन्दड येथे कोविड केअर सेंटर चालू झाल्यास ग्राम तिडका, बोपाबोडी, श्रीरामनगर, फुटला, राका, पिपरी, पळसगाव, या गावातील जवळपास २५ ते ३० हजार नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार आहे, हर्ष मोदी यांनी असे आव्हाहन केले आहे की, समस्त परिसरातील लोक प्रतिनिधी , राजकीय दल व सामाजिक संस्था, यांनी कोरोना सारख्या महामारीच्या संकटात एकत्र येऊन धर्म , जात, पक्ष पात न करता, एकत्रित येउन व स्वताची काळजी घेऊन लोकंना सहकार्य करावे.



  • कोर झोन मध्ये नागरिकांची ये – जा चालुच. 

दिनांक – १५ एप्रिल रोजी उप विभागीय अधिकारी यांनी सौन्दड गाव कोर झोन म्हणून घोषित केले, त्या अनुसंघाने स्थानिक ग्राम पंचायत यांनी गावात बाहेर गावरील नागरिकांचा शिरकाव होऊ नये यासाठी मुख्य मार्ग बंद केले, तरी देकील बाहेर गावातील नागरिक गावात ये – जा करतात त्या मुळे गावातील वाढती रुग्ण संख्या पाहता करोना चा प्रसार होण्याची सक्यता नाकारता येत नाही, सध्या गावातील रुग्ण संख्या १०४ वर पोहोचली, तर ८ लोकांचा मृत्यू झाला यातील २२ रुग्ण बरे झाले अशून आता ७४ लोक बाधित अश्ल्याची माहिती प्राप्त आहे. त्या मुळे नागरिकांनी संपर्कात येणे टाळावे असे आव्हान हर्ष मोदी यांनी केले आहे.



 

Leave a Comment