ऑक्सिजनच्या गळतीमुळे नाशिकमध्ये आज तब्बल २२ रुग्णांचा दुर्दैवी अंत.


नाशिक, वृतसेवा, दिनांक – २१ एप्रिल २०२१ – नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज अत्यंत दुर्दैवी प्रकार घडला आहे. ऑक्सिजनच्या गळतीमुळे नाशिकमध्ये आज तब्बल २२ रुग्णांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकारने प्रत्येकी ५ लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे.या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील हळहळ व्यक्त केली आहे.मात्र आता या घटनेवरून राजकारणाला सुरूवात झाली आहे.या घटनेसाठी भाजप जबाबदार असून त्यांनी घटनेची जबाबदारी स्विकारावी, असा मागणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे, असी माहिती hwnews ने प्रकाशित केली आहे.



नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात आज ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे तब्बल २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही जीवीतहानी वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. नाशिकच्या दुर्घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सचिन सचिन सावंत यांनी केली आहे.यारुग्णालयाचे नियोजन नाशिक महानगरपालिकेकडे होते. त्यामुळे याची जबाबदारी नाशिकचे भाजपचे महापौर आणि स्थानिक ३ भाजप आमदारांनी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.त्यामुळे आता नाशिकच्या या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरूवात झालेली आहे.

एकीकडे महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्ये झपाट्याने वाढत आहे. ॲाक्सिजनची प्रचंड कमतरता आहे ,अशा परिस्थितीत ॲाक्सिजनच्या गळतीमुळे जी दुर्घटना झाली त्यावरून महाराष्ट्रात सध्या हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची सविस्तर चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.


 

Leave a Comment