प्रत्येक बूथवर जाऊन केलेल्या विकासकामांची माहिती जनतेला द्या – आ. विनोद अग्रवाल.

प्रतिनिधी/गोंदिया, दि. 19 जुलै : महाराष्ट्रात येत्या 3 महिन्यांत विधानसभा निवडणुका होत असून, त्यासाठी जनता की पार्टी पक्षाने बूथ मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. 15/07/2024 रोजी विश्रामगृहात जनता की पार्टी या पक्षाची अनुसूचित जाती आघाडीची बैठक पार पडली. गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार विनोद अग्रवाल यांनी 28 हजाराहून अधिक मतांनी विजय मिळवला होता या विजयाचे सर्व श्रेय संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जनतेला जाते. आमदार विनोद अग्रवाल यांच्या संघटनेतील ताकदीमुळे त्यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळवता आला, एवढेच नाही तर ग्रामपंचायतींमध्ये सर्वाधिक सरपंच, जिल्हा परिषदेचे 4 सदस्यांसह पंचायत समितीचे 10 सदस्य, पंचायत समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता मिळवण्यात आ. विनोद अग्रवाल यांना यश आले. 

त्यासाठी आमदार विनोद अग्रवाल यांनी जनता की पक्ष (की संघटना) च्या अनुसूचित जाती आघाडीची बैठक घेऊन सर्वांना सूचना केल्या. संघटनेच्या विस्तारासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्येक बूथवर जाऊन जनतेला केलेल्या विकासकामांची माहिती देणे आणि शासनाच्या लाभदायक योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवणे. याशिवाय आमदार विनोद अग्रवाल यांनीही कार्यकर्त्यांना संघटनेच्या विस्ताराबाबत व कार्यकारिणीबाबत संघटनेच्या कार्याची माहिती दिली.

उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत पक्षासाठी पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करण्याचे तसेच आमदार विनोद अग्रवाल यांनी केलेली विकासकामे तसेच सामाजिक दृष्टीकोनातून समाजासाठी केलेले कार्य व योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करण्याची हमी व सर्वांनी लाभ देण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केले तसेच, गोंदिया विधानसभेत पुन्हा एकदा आमदार विनोद अग्रवाल यांना आमदार करण्याकरीता कार्यकर्त्यांनी जोश भरला आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कामाला सुरुवात करण्याची शपथ घेतली.

यावेळी आमदार विनोद अग्रवाल, जनता की पार्टीचे अध्यक्ष भाऊराव उके, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, चेतन बहेकार संचालक कृउबास गोंदिया,माजी सरपंच पिंडकेपार सुधीर चंद्रिकापुरे, संचालक सेंट्रल कृषक होमनदास पटले, तालुकाध्यक्ष अनुसूचित आघाडी फिरोज बंसोड, माजी उपसरपंच झिलमिली सूर्यमणि रामटेके, सनम कोल्हाटकर, प्रितम मेश्राम, रंजित बारलिंगे, चित्रसेन (आरजू) डोंगरे, उपसरपंच चारगांव संतोष शेंडे, गुलशन डहाट, अरविंद डहाट, राहुल बोरकर, सचिन गजभिए, अशोक मेश्राम (गुरूजी), मिलिंद रामटेके, विनोद चौहान, प्रकाश मेश्राम, आनंद वासनिक, जयन मेश्राम, बबलू डोंगरे, मोंटू नागदिवे, राजेश खोब्रागढ़े, सचिन मेश्राम, आदी कार्यकर्त्ता व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें