वन्यप्राणी रानडुक्कर व चितळ शिकार प्रकरणी चार आरोपी सह दोन बंदुक ताब्यात. 

गोंदिया, दि. 02 सप्टेंबर : जिल्ह्यातील अर्जुनी/मोरगाव तालुक्यात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या एका टोळीला अर्जुनी/मोरगाव वन विभागाने 01 सप्टेंबर रोजी अटक केली आहे. अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील राजीवनगर येथील विशाल सहारे यांच्या घरी वन्यप्राणी चितळाचे मास असल्याची माहिती अर्जुनी/मोरगाव वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांना मिळाली असता ते आपल्या ताफ्यासह मौकास्थळी धाड टाकत यावेळी शिकार करण्याकरिता उपयोगात आणणारी लोखंडी सळई तसेच फासे, व दोन बंदूक मिळाले, आरोपी विशाल सहारे याच्या सोबतीच्या घराची झळती घेतली असता वन्यप्राणी चितळ व रानडुक्कराचे कच्चे मास आढळले.

कच्चा मास व दोन बंदुकांसह वनविभागाने इतर साहित्य जप्त केले असून एकूण चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर या शिकार प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांनी दिली आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई,  नवेगाव/बांध चे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली या प्रकणाचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन कटरे यांचेसह अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. चारही आरोपींना आज मा. न्यायालयासमोर हजार करणार असून आरोपींना वन कोठडी ची मागणी करणार असून तपासात आणखी आरोपी पुढे येण्याची शक्यता आहे. 

 

Leave a Comment

और पढ़ें