लोहिया विद्यालयातील गणेशाचे शांततामय वातावरणात विसर्जन

सडक अर्जुनी, दि. 15 सप्टेंबर : सौंदड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय, जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा व लोहिया कॉन्व्हेन्ट अँड प्रायमरी इंग्लिश स्कूल, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022 या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांच्या प्रेरणेतून विद्यालयात विद्यार्थी गणेश उत्सवाची सुरूवात करण्यात आली.

दि. 07 सप्टेंबर 2024 रोजी श्री. गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली व दिनांक 11 सप्टेम्बर 2024 ला विसर्जन करण्यात आले पुष्पहार, रांगोळी, चित्रकला, भजन, गीतगायन अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहि गोपालकाला कार्यक्रम सुमधुर भजनसंगीताच्या तालासुरात पार पाडण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने आ. न. घाटबांधे, संस्था उपाध्यक्ष, संस्था सदस्य पंकज लोहिया, परेश लोहिया, चिंतामन थेर सेवानीवृत गटशिक्षना धीकारी, अनिल मेश्राम सेवानिवृत प्राचार्य, प्रल्हाद कोरे, नालिराम चांदेवार
तसेच परिवारातील सदस्यगन, प्राचार्य उमा बाच्छल,  गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षिक श्री. डी. एस. टेभूर्ण, प्राध्यापक राजेश अग्रवाल सह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, गावकरी, निमंत्रित पाहुणे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त आयोजित गणेशजिंच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. महाप्रसादाचा आस्वाद सर्व शालेय घटक, पालकवर्ग, निमंत्रित पाहुणे तसेच गावकऱ्यांनी घेतला.

महाप्रसादानंतर श्री. गणेशाची सुमधुर भक्तिमय संगीताच्या गजरात विसर्जन शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सर्वच शालेय घटकांनी भाग घेतला. यात गणेशजिंच्या नावाचा जयघोष करीत निघालेल्या शोभायात्रेत संगीताच्या तालासूराचा विद्यार्थ्यांनी नाचण्याचा भरघोस आनंद लुटला, गावातून निघालेल्या या गणेशजिंच्या शोभा यात्रेद्वारे गावकऱ्यांनी श्री. गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले व विद्यार्थांच्या नृत्यांचा सुद्धा आनंद लुटला.

पाच दिवस विद्यालयात आयोजित विद्यार्थी गणेश उत्सवा दरम्यान गणेशजिंची सकाळ – सायंकाळ होणारी आरती तसेच यानिमित्त आयोजित भजन संगीतामुळे विद्यालयात भक्तिमय वातावरण निर्माण झाले, या उत्सवादरम्यान आयोजित विविध कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा एकंदरीत सर्वांगीण विकासाला नक्की चालना मिळाली. विद्यार्थ्यांनी भरभरून या उत्सवाचा आनंद लुटला. या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्वात मोलाचे मार्गदर्शन जगदीश लोहिया, संस्थापक – संस्थाध्यक्ष लो.शि. संस्था यांचे लाभले असून विद्यालयाचे प्राचार्य उमा बाच्छल यांचे कौसल्यपूर्ण नियोजन, विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांची प्रशंसनीय मेहनत तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य यामुळे कार्यक्रम शांततामय वातावरणात पार पडले. गावकऱ्यांनी उत्सवादरम्यान दिलेल्या सहकार्याबद्दल शालेय सर्व घटकांनी आभार व्यक्त केले आहे व यापुढेही असेच सहकार्य लाभाण्याविषयीची अपेक्षा दर्शविली आहे.

Leave a Comment

और पढ़ें