भर पावसात भिजत “कर्तव्य पार पाडणाऱ्या” पोलिस कर्मचाऱ्याचा पोलिस अधीक्षकांनी केला अभिनंदन!

  • महाराष्ट्र केसरी न्यूज च्या बातमीची दखल, सर्वात आदी वृत्त महाराष्ट्र केसरी न्यूज ने प्रकाशित केले होते.

गोंदिया, दीं. 17 सप्टेंबर : सर्कस मैदान, गोंदिया येथे दि. 13 सप्टेंबर रोजी महत्वाचे- अति महत्वाचे व्यक्ती यांचे दौरा बंदोबस्त प्रसंगी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार पो. शि. प्रविणकुमार प्रभुजी वाढीवे, ब.नं. 1879 यांची वाहतुक नियमन करीता जयस्तंभ चौक, गोंदिया येथे बंदोबस्त ड्युटी असतांना, सदर पो. अंमलदार यांनी बंदोबस्त दरम्यान वाहतुक सुरळीत राहण्यासाठी भर पावसात कर्तव्यदक्ष राहुन अथक परिश्रम घेऊन वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अत्यंत मोलाची प्रशंसनीय कामगीरी बजावली आहे.

हे ही वाचा : भर पावसात भिजत ‘कर्तव्यदक्ष’ वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल. 

सदर बाबत समाज माध्यमावर व्हिडिओ प्रसारित होवून सदर अंमलदाराचे सगळीकडे कौतुक होत होते. ही प्रशंसनीय बाब मा. पोलीस अधीक्षक यांचे लक्षात येताच प्रंशसनीय कामाचे कौतुक म्हणून पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, यांनी सदर अंमलदार यास ,”प्रशंसापत्र” देवून अभिनंदन कौतुक केले आहे. तसेच भविष्यात सुध्दा चांगले समाजकार्य घडावे पोलीस दलाचे नाव उंचवण्याकरिता उत्कृष्ठ कामगिरी करावी अश्या शुभेछ्या दिलेल्या आहेत.

विशेष म्हणजे या बाबद सर्वात आदी वृत्त महाराष्ट्र केसरी न्यूज ने प्रकाशित केले होते, आणि याचीच दखल म्हणून पोलिस अधीक्षक गोंदिया यांनी घेतली आहे. दिनांक 13 सप्टेंबर रोजी गोंदिया येथे गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. 

Leave a Comment

और पढ़ें