सडक अर्जुनी, दि. 15 सप्टेंबर : सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम म्हसवानी येथे किरण ताई कांबळे यांनी गणेश मंडळात कीर्तनाचा कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी आयोजित केला होता, दरम्यान कीर्तनाच्या कार्यक्रमाला आपण भेट द्यावी अशी मंडळाची खूप इच्छा होती, नागरिकांच्या इच्छेला लक्ष्यात घेता कार्यक्रम स्थळी भेट दिली, उपस्थित गावकऱ्यांना संबोधन केले दरम्यान त्या म्हणाल्या की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.
या महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक संत जन्माला आले संतांनी आपल्या विचारातून लोकांना जागृत करण्याचं काम केले, चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला, त्याची पुण्याई मना की आपल्यावर चांगले संस्कार पडले, एखाद्या ओळखीचे कोणी वयोवृद्ध दिसले तरी आपण त्यांना नमस्कार करतो, भारतात लोकशाही आहे, सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, परंतु आई- वडिलांशी बोलताना मुलांनी भान ठेवूनच बोलावे, दरम्यान कीर्तनकार यांनी पुष्पगुच्छ देऊन किरण ताई चे स्वागत केले, कार्यक्रमाला आल्याबद्दल सर्व मंडळींनी किरण ताई चे आभार मानले.