लोहिया विद्यालयात हिंदी दिवस साजरा

सडक अर्जुनी, दि. 15 सप्टेंबर : सौदंड येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहीया माध्य. व उच्च माध्य. विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहीया प्राथ. शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 सप्टेंबर 2024 रोज शनिवारला विद्यालयात लो. शि. संस्थेचे संस्थापक- संस्थाध्यक्ष जगदीश लोहीया यांच्या प्रेरणेने हिंदी दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लो. शि.संस्थेचे उपाध्यक्ष आ. न. घाटबांधे, प्रमुख अतिथी प्राचार्या उमा बाच्छल, मुख्याध्यापक मनोज शिंदे, पर्यवेक्षक डि. एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर.एन. अग्रवाल, स .शिक्षिका कल्पना काळे यांच्या उपस्थितित साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींनी माता सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.न. घाटबांधे यांनी वि‌द्यार्थ्यांना हिंदी दिवसाचे महत्व समजावुन दिले.

विद्यालयाच्या प्राचार्यानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, सर्वांनी आपल्या मातृभाषेबरोबरच राष्ट्रभाषेचा आदर करायला पाहीजे, वि‌द्यालयातील शिक्षकांनी सुद्धा हिंदी दिवसाचे महत्त्व पटवून दिले. तसेच वि‌द्यार्थानी आपल्या गीत व भाषणातून हिंदी दिवसाचे महत्व सांगितले, आज दि. 14 सप्टेंबर 2024 रोज शनिवारला महावाचन घेण्यात आले यामध्ये सर्व विदयार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. कार्यक्र‌माला विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स.शि. आर. आर. मोहतुरे यांनी केले तर आभार प्रा. एस . पी. करंबे यांनी मानले.

Leave a Comment

और पढ़ें