- आमदार व खासदार रिल चा फिल घेताना चे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल!
गोंदिया, दि. 15 सप्टेंबर : गोंदिया भंडारा जिल्यात 9 व 10 सप्टेंबर रोजी आलेल्या पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कॉग्रेस पक्षाचे खा. डॉ प्रशांत पडोळे यांनी चक्क आपल्या कारच्या बोनेट वर बसून हात हालवीत, स्मित हास्य करीत, पूरग्रस्त, नुकसान ग्रस्त भागाचा दौरा केला, दरम्यान त्यांनी त्याची रील बनवून स्वतःच्या फेसबुक पेजवर पोस्ट केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे.
आता आमदार साहेब कसे मागे राहणार यात गोंदियाच्या तिरोडा विधानसभा क्षेत्राचे भारतीय जनता पक्षाचे आमदार विजय राहांगडाले यांनी तर चक्क ट्रॅक्टर च्या बकेट वर बसून काही लोकांसोबत आपल्या मतदार संघात, पूरग्रस्थ, नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली आहे. ते ही स्मित हास्य करीत हात हलवताना दिसत आहेत. प्राप्त माहितीनुसार आमदार विजय रहांगडाले हे काही अधिकाऱ्यांना घेऊन पंचनामे करण्यासाठी गेले होते. असेही सांगितले जात आहे.
आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांचे घरे पडली, दुःखाच्या या काळात आमदार व खासदार नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करताना आपल्या भावना, संवेदना खिशात ठेवून फिरतात का ? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आमदार व खासदार रिल चा फिल घेताना चे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.