गोंदिया, दि. १५ सप्टेंबर : येथील जयस्तंभ चौकात वाहतूक पोलीस भर पावसात वाहतूक नियमन करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गोंदिया शहर वाहतूक विभागाचे शिपाई प्रवीण वाढिवे यांचा हा व्हिडीओ आहे. शुक्रवारी (दि.१३) रोजी सायकांळच्या सुुमारास पावसामध्ये उभं राहून वाहतूक नियमन केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. भर पावसात भिजत त्यांनी आपली कामगिरी बजावली त्या मुळे त्याचे सर्वत्र कौतुक देखील होत आहे.
गोंदियात शुक्रवारी सर्कस मैदान येथे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचा काँग्रेस पक्षात जाहीर पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. दरम्यान कार्यक्रम संपल्यानंतर नेमकं त्याचवेळी जोरदार पाऊस बरसला. जोरदार पाऊस कोसळल्याने गोंदियाकरांची चांगलीच गोची झाली. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र मुसळधार पावसातही ट्राफिक जामची समस्या निर्माण होऊ नये म्हणून भरपावसात वाहतूक ओलीस प्रवीण वाढिवे यांनी आपल्या सहकारी कर्मचारी मित्रासह कर्तव्य बजावले. हाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.