तुमच्या पैकी महिला आमदार झाली तर आश्चर्य वाटू देऊ नका : माजी मंत्री राजकुमार बडोले

  • शेंडा क्षेत्रातील बामणी/ ख. येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन. 

सडक अर्जुनी, दि. 19 सप्टेंबर : येवढ्या साऱ्या यौजना महिलांसाठी आहेत, यात सुकन्या समृद्धी योजना, माझी कन्या भाग्यश्री यौजना, या यौजने मध्ये आमच्या घरामध्ये एखादी मुलगी झाली, आणि ती 18 वर्षाची झाली तर तिला एक लाख रुपये भेटायची यौजना आहे. कुणाच्या काळातील यौजना आहेत सांगा, ही आमच्या काळातील यौजना आहे, म्हणजे सगळ्या यौजना तुम्ही पाहिल्या त्यात बालिका समृध्दी यौजना मुलींना मोफत शिक्षण, आता सगळ्या आमच्या पोरी शिकतील, त्याला शाळेमध्ये पैसे लागणार नाही, आमच्या मुलींसाठी आम्ही वस्तीगृह सुरू केले, आम्ही सडक अर्जुनी येथे वसतिगृह सुरू केले, देवरी येथे आदिवासी मुलींच वस्तीगृह माझ्या काळात मी पालक मंत्री असताना सुरू केले, अनेक ठिकाणी आपण पोरींसाठी स्पेशल वस्तीगृह सुरू केले.

माननीय मोदीजींनी तर कहरच केला, की पहिले ओबीसींच्या आपल्या ज्या जिल्हा परिषद मध्ये महिला भगिनी होत्या, ग्रामपंचायत मध्ये 50 टक्के आरक्षण दिलं, पण लोकसभे मध्ये आणि विधानसभे मध्ये आमच्या भगिनींना तिथे जागा नव्हत्या, आता मोदींनी 33 % आरक्षण महिलांसाठी दिलं, आणि पुढे अनेक महिला विधान सभे मध्ये जातील, लोकसभे मध्ये जातील, 33% टक्के महिला राहतील, म्हणजे आता 2029 मध्ये या विधान सभे मध्ये पण, एखादी तुमच्या पैकी महिला आमदार झाली तर आश्चर्य वाटू देऊ नका, वाजवा बर टाळ्या 2029 मध्ये तुमच्या पैकी नाही तर इकडे बसल्या पैकी, कोणी तरी आमदार होण्याची शास्वती आहे, असे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी महिला मेळ्यात मंचावरून महिलांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेंडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणारे ग्राम बामणी/ख. येथे दिनांक : 19 सप्टेंबर रोजी भव्य महिला मेळाव्याचे आयोजिन जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवार यांनी केले होते. त्यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करतांना विविध योजने ची माहिती महिलांना दिली.

यावेळी मंचावर माजी मंत्री राजकुमार बडोले होते, तर जिल्हा महामंत्री सिता रहांगडाले, तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, चामेश्वर गहाने, जी.प. सदस्य डॉ. लक्ष्मण भगत, लायकराम भेंडारकर, डॉ. भुमेश्वर पटले, कविता रंगारी, निशा तोडासे, संगीता खोब्रागडे, शालींदर कापगते, चेतन वडगाये, विलास वट्टी, सपना नाईक, दिपाली मेश्राम, वर्षा शहारे, तसेच अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्हा परिषद क्षेत्रातील महिलानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

पुढे बोलताना बडोले म्हणाले की, आमच्या सरकारने महिला शक्षमिकरणासाठी मोठ्या प्रमाणत योजना सुरू केल्या महिलांचा आर्थिक विकास होऊन आपल्या पायावर उभ्या राहण्यासाठी महा युती सरकारकडून खूप योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिन योजनेतून 1500 शे.रुपये दर महिन्याला देत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरकार आली तर 1500 रू पेक्षा जास्त रक्कम लाडकी बहीण योजने द्वारे आमची सरकार देण्याचे नक्कीच विचार करेल, माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्र सरकार आणि महायुती सरकारच्या विविध योजना विषयी माहिती या महिला मिळाव्यात दिली. तसेच मंचकावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या आणि महा युती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली.

Leave a Comment

और पढ़ें