गोंदिया, दि. 02 सप्टेंबर : आज सकाळी पॉलिटेक्निक कॉलेज समोर हिट अँड रनचा थरात पाहायला मिळाला असून हि संपूर्ण घटना रस्त्यावर लागलेल्या एका सी सी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या अपघात तीन लोक गंभीर जखमी झाले असून तिघांवर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, गोरेगाव वरून गोंदियाच्या दिशेने येत असताना पॉलिटेक्निक कॉलेज समोर भरधाव कारणे रोडचा कडेला बसलेल्या दोन ट्रक ड्रायव्हर व एक सायकल चालकाला भरधाव वेगाने येत उडवले आहे.
https://x.com/maharashtrakes1/status/1830509576757862496?t=CCoEEkC-awEv-zrHGOQnyg&s=19
या घटनेत दोन ट्रक ड्रायव्हर आणि एक सायकल सवार गंभीर जखमी झाला असून यात २४ वर्षीय कार चालक खोमेश उरकुडे राहणार कोसेटोला गोरेगाव तर जखमी मध्ये ५४ वर्षीय हेमराज राऊत राहणार कारंजा तसेच ३८ वर्षीय कादीर शेख राहणारा फुलचुर येथील असुजन एक सायकल सवार देखील गंभीर जखमी असून तिघांवर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. वाहन क्रमांक : एम.एच. 35 ए.जी. 1588 मारुती कंपनीची स्विफ्ट डिझायर या गाडीने अपघात केला आहे.